पुणे : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Former Chief Minister Uddhav Thackeray) यांचे सरकार जाऊन आता भाजपच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (BJP-led Maharashtra Chief Minister cm Eknath Shinde’s government) यांचे सरकार स्थानापन्न झाले आहे. अशावेळी महावितरण या राज्य सरकारच्या कंपनीने वीज दरवाढ करून ग्राहकांना झटका दिल आहे. वीजनिर्मितीसाठीच्या कोळसा आणि इंधनाचे दर वाढल्यामुळे इंधन समायोजन आकारामध्ये महावितरणकडून वाढ केल्याचा फटका आता सगळ्यांना बसणार आहे. (state government company MSEDCL has shocked the consumers by increasing the electricity tariff)
Marathi Kavita : आषाढी वारीपेक्षा मंत्रालयात सत्यनारायण भारी..! https://t.co/II28gjfEVT
Advertisement— Krushirang (@krushirang) July 9, 2022
Advertisement
केंद्रातील मोदी सरकारच्या चुकीच्या कोळसा धोरणाचा फटका अनेक महिन्यांपासून देशातील वीज कंपन्या आणि पर्यायाने ग्राहक म्हणून नागरिकांना बसत आहे. जून ते ऑक्टोबर या ५ महिन्यांच्या वीज बिलांत इंधन समायोजन आकार वाढल्यावर या ५ महिन्यांत राज्यातील पावणेतीन कोटी ग्राहकांवर ६.२५ हजार कोटी रुपयांचा मोठा भार पडणार आहे. यामुळे १०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना ६५ रुपये तर, १०१ ते ३०० युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांना १४५ रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. आता जून ते ऑक्टोबर २०२२ या ५ महिन्यांच्या वीज बिलांवर इंधन समायोजन आकार वाढवला आहे. घरगुती, थ्रीफेज, पाणीपुरवठा योजना, कृषी, पथदिवे, इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग स्टेशन आदी वीज जोडणी असलेल्या ग्राहकांना भुर्दंड सहन करावा लागणार आहे. (coal and fuel prices for power generation will now hit everyone)
Rakesh Jhunjhunwala: झुनझुनवाला घेणार गगनभरारी; पहा कोणते नवे फीचर असेल यात https://t.co/uLmWJgYWYU
Advertisement— Krushirang (@krushirang) July 9, 2022
Advertisement
कृषी वापराच्या वीज जोडणीवर मीटर टेरिफ पंपसेटसाठी प्रतियुनिट ४० पैसे तर मीटर टेरिफ इतर ग्राहकांसाठी ६५ पैसे इंधन समायोजन आकार असल्याने शेतकऱ्यांना याचा झटका बसेल. कृषी वापराच्या वीज जोडणीवर मीटर टेरिफ पंपसेटसाठी प्रतियुनिट ४० पैसे तर मीटर टेरिफ इतर ग्राहकांसाठी ६५ पैसे इंधन समायोजन आकार, ग्रामपंचायत, नगरपालिकांना पथदिव्यांच्या वीजवापरात १ रुपया व महानगरपालिकांना १ रुपया २५ पैसे प्रतियुनिटने आकार वाढणार आहे. पाणीपुरवठा योजनांत ६५ पैसे ते १ रुपये ५० पैसे प्रतियुनिटची वाढ झाल्यावर याचाही फटका सहन करावा लागणार आहे. यावर आता नवे राज्य सरकार के दिलासा देणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
Heart attack symptoms: सावधान..! ‘त्या’ आजारांमध्येही आहे हृदयविकाराची लक्षणे; जाणुन घ्या संपूर्ण माहिती https://t.co/XQS8TVKwBY
Advertisement— Krushirang (@krushirang) July 9, 2022
Advertisement