Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Marathi Kavita : आषाढी वारीपेक्षा मंत्रालयात सत्यनारायण भारी..!

Please wait..
Marathi Kavita : इकडे म्हणतात संतविचारांचा सुरू आहे जागर..
तिकडे मंत्रालयात आलीय सत्यनारायणाची घागर..
त्या घागरीत नेमके काय बुवा आहे दडले..?
दुर्दैव असे की, संतविचारांनीही मनुस्मृतीदहन नाहीच हो घडले…

Advertisement
श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातला भेद काही केल्या मिटेना..
मनुस्मृतीचा जोर काही केल्या शिकलेल्या समाजातही हटेना..
माऊली, तुकोबा, गाडगेबाबांना वारकरी महाराष्ट्र विसरला..
म्हणून ऐन वारीच्या काळात संतविचार आणखी खाली घसरला…

Advertisement
आपल्या संतांनी मांडला आहे समता, बंधुता, मानवतेचा विचार..
तरीही आपण झालोय मनुस्मृती नावाच्या बोगस गोष्टीत लाचार..
पुरोगामी म्हणून आम्ही अन् वारकरी म्हणूनही तुम्ही शांत कसे..?
यातून आपल्याच शाहू-फुले-आंबेडकरांच्या महाराष्ट्राचे होत आहे की हसे…

Advertisement
शिवरायांनी दिलाय आपल्याला कर्तव्यदक्षतेचा मूलमंत्र..
पण त्यांचे नाव घेऊन आम्ही गाजवणार फक्त अघोरी मंत्र..
संस्कृती परंपरेच्या नावाखाली किती दिवस आपण बेगडी वागणार..?
अशाने का हा महाराष्ट्र सात ट्रिलियनची अर्थव्यवस्था होणार..?

Advertisement
सांग रे सरकारा, याच्याशी नेमका काय आहे अर्थसंबंध..?
म्हणूनच का लागायला लागलेत संतविचारांना निर्बंध..?
याला तुम्ही अन् आम्हीही आहोत रे सगळे जबाबदार..
पण यातून भविष्यात काय होणार याबाबत राहा खबरदार..!!
– सचिन मोहन चोभे

Advertisement
Advertisement

Leave a Reply