Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Ration card लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! ‘त्या’ प्रकरणात सरकारने घेतला मोठा निर्णय

Please wait..

Ration card: शिधापत्रिकाधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. आता लवकरच पात्र शेतकऱ्यांना (Farmers) नवीन शिधापत्रिका बनवण्यात येणार आहे. नवीन शिधापत्रिका बनविण्याची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती अन्न पुरवठा मंत्र्यांनी दिली आहे. वास्तविक, उत्तराखंडमध्ये 91 हजारांहून अधिक लोकांनी रेशनकार्ड सरेंडर केले आहे. विशेष म्हणजे 5 मे रोजी अन्न पुरवठा विभागाने अपात्र शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिका सरेंडर करण्याचे आवाहन केले होते. 31 मे पर्यंत अपात्र शिधापत्रिकाधारकांना शिधापत्रिका जमा करण्याची अंतिम तारीख 30 जूनपर्यंत वाढवण्यात आली होती.

Advertisement

Advertisement

91 हजार लोकांनी आपले कार्ड सरेंडर केले
सरकारच्या आवाहनानंतर एकूण 91 हजार शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका सरेंडर केली. अन्न पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी जनतेचे आभार मानताना सांगितले की, राज्यभरात आतापर्यंत 91 हजार शिधापत्रिकाधारकांनी आपली शिधापत्रिका सरेंडर केली आहेत. सरकारने अपात्र लोकांना रेशनकार्ड सरेंडर करण्याचे आवाहन केले होते. यानंतर, शेवटच्या तारखेला 31 मे रोजी मोठ्या संख्येने शिधापत्रिकाधारक रेशनकार्ड जमा करण्यासाठी डीएसओ कार्यालयात पोहोचले, त्यानंतर सरकारने त्याची तारीख वाढवली.

Advertisement
Loading...

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

मंत्र्यांनी माहिती दिली
अन्न पुरवठा मंत्री रेखा आर्य यांनी रेशनकार्ड सरेंडर करणाऱ्यांचे आभार मानत राज्यात त्यांच्या स्तरावर शिधापत्रिका बनवल्या जातील असे सांगितले. राज्यात 22 लाखांहून अधिक शिधापत्रिका आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा नवीन शिधापत्रिका बनविण्याच्या प्रक्रियेला वेग येणार आहे. लवकरच पात्र लोकांची शिधापत्रिका बनवली जाणार आहेत. अपात्र लोकांच्या शिधापत्रिका जमा करण्यात आल्या आहेत. राज्यात मोठ्या प्रमाणावर शिधापत्रिका सरेंडर करण्यात आल्या आहेत, त्यामुळे येत्या काही दिवसांत नवीन स्तरावरून शिधापत्रिका बनवण्यात येणार असल्याचे मंत्री म्हणाले.

Advertisement
Advertisement

Leave a Reply