Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Political Crisis: अर्र.. अखेर वाजला की बोऱ्या..! पहा कशामुळे गडगडले सरकार

Please wait..

Political Crisis : लंडन : ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी अखेर आपल्या पदाचा राजीनामा (British Prime Minister Boris Johnson announced his resignation) दिला आहे. तत्पूर्वी त्यांनी देशाला संबोधित करताना आपल्या मन की बात स्पष्ट केली. आता नवीन नेत्याची निवड होईपर्यंत बोरिस जॉन्सन पंतप्रधानपदावर राहतील, असे डाउनिंग स्ट्रीटने (Downing Street London) जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे. जॉन्सन यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच म्हटले की, आतापर्यंतच्या घडामोडींवरून हे स्पष्ट झाले आहे की, संसदीय पक्षाला आता पक्षाचा नवा नेता या पंतप्रधानपदावर बसवायचा आहे. नवीन पंतप्रधानांच्या निवडीचे वेळापत्रक पुढील आठवड्यात दिले जाईल. मात्र, पुढील पंतप्रधानाची नियुक्ती होईपर्यंतचे काम करण्यासाठी त्यांनी मंत्रिमंडळाची स्थापना केली आहे. (Prime Minister Johnson’s crisis)

Advertisement

Advertisement

आपल्या भाषणादरम्यान पंतप्रधान जॉन्सन खूप भावूकही झाले. ते म्हणाले की, 2019 मध्ये माझ्या नेतृत्वाखाली पक्षाला 1987 नंतर सर्वात मोठे बहुमत मिळाले. तर आमची मतांची टक्केवारी 1995 नंतर सर्वाधिक होती. आताच्या कार्यकाळात मी केलेल्या सर्व कामांचा मला अभिमान आहे. ब्रेक्झिटसह देशाला कोरोना महामारीतून या दरम्यान देश बाहेर काढण्यात यश आले. करोना लसीकरण कार्यक्रमाच्या यशाबद्दलही बरे वाटते. दरम्यान, रशियाच्या युद्धखोर धोरणात युक्रेनला मदत करूनही ब्रिटनने संपूर्ण जगाला सकारात्मक रस्ता दाखवला आहे. सर्व पक्षाच्या सहकाऱ्यांचे आभार मानले.

Advertisement

Advertisement
Loading...

जॉन्सन म्हणाले की, “आताही उर्वरित टर्मसाठी सरकारला खूप काही करायचे आहे. मी माझ्या सर्व सहकाऱ्यांना पटवून देण्याचा प्रयत्न केला की आता पंतप्रधान बदलणे चुकीचे ठरेल. पण मी त्यांना ते अखेरीस पटवून देऊ शकलो नाही. राजकारणात असे होत असते. आताच्या पक्षाच्या निवडणूक व्यवस्थेची खिल्ली उडवत ते म्हणाले की, लवकरच या नव्या राजकीय मॉडेलमधून आपल्याला नवा नेता मिळेल. माझ्या जण्याने भविष्यात अनेकांची निराशा होईल आणि जगातील सर्वोत्तम नेता सोडल्याचे दु:ख त्यांना स्वतःलाच भोगत बसावे लागेल. याआधी जॉन्सन यांच्या 39 हून अधिक मंत्री आणि संसदीय सचिवांनीही त्यांची बाजू सोडली होती. सत्ताधारी कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या खासदारांनी केलेल्या बंडानंतर जॉन्सनच्या मंत्र्यांनी चोवीस तासांपेक्षा कमी कालावधीत त्यांच्या पदांचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यावरही पायउतार होण्याचा दबाव वाढला आहे. (prime minister would be a wrong move)

Advertisement

Advertisement

पंतप्रधान जॉन्सन यांच्या संकटात भर घालत, त्यांच्या सरकारमधील वरिष्ठ मंत्री बुधवारी संध्याकाळी पंतप्रधानांच्या निवासस्थान म्हणजे 10, डाउनिंग स्ट्रीटवर गेले आणि त्यांना पद सोडण्यास सांगितले. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे त्यांच्या कट्टर समर्थक समजल्या जाणाऱ्या गृहमंत्री प्रिती पटेल (Home Minister Priti Patel) यांचाही या मंत्र्यांमध्ये समावेश होता. मंत्र्यांवर दबाव आणण्यासाठी जॉन्सन यांनी वैयक्तिक भेट घेतली. पण त्यांच्या 15 हून अधिक मंत्र्यांनी पुढच्या निवडणुकीत कंझर्व्हेटिव्ह पक्षाच्या (Conservative Party’s prospects in the next election) शक्यता सुधारण्यासाठी नेतृत्व बदलाचा आग्रह धरल्याचे समजते.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply