Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Business News: अस्थिरतेतही ‘या’ कंपनीने केलीय कमाल; पहा नेमके काय म्हटलेय त्यांनी

Please wait..

मुंबई : सध्या शेअर बाजारात (Share Market News) अस्थिरतेचे वातावरण आहे. अशावेळी बिजनेस सेक्टरमध्ये (Business News) एका कंपनीने आपण मोठी कामगिरी केल्याचा दावा केला आहे. फिनटेक कंपनी एंजल वन लिमिटेडने (Angel One Ltd.) जून २०२२साठी त्यांच्या व्यवसायामध्ये झालेल्या वाढीच्या आकडेवारींची घोषणा करताना झालेल्या वाढीचे आकडे सादर केले आहेत.

Advertisement

Advertisement
Loading...

या कंपनीने आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीमध्ये १०.४१ दशलक्ष ग्राहक अधिग्रहीत केले आहेत. ज्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत ९६.९ टक्क्यांची वाढ झाली असल्याचे म्हटले आहे. जून २०२२ मध्ये ०.३४ दशलक्ष ग्राहकांची भर यासह तिमाहीमध्ये १.२६ दशलक्ष ग्राहकांची भर (million subscribers in the quarter) अशी वाढ झाली आहे. एंजल वनने जून २०२२ मध्ये वार्षिक ४२.६ टक्क्यांच्या वाढीसह ७०.१५ दशलक्ष ऑर्डर्सच्या ऑर्डर केल्या आहेत. जून २०२२ मध्ये अॅव्हरेज डेअरी टर्नओव्हर (एडीटीओ) (average dairy turnover (ADTO) increased) वार्षिक ११८.५ टक्यांच्या वाढीसह ९.७६ ट्रिलियन रूपयांपर्यंत पोहोचला. जून २०२२ मध्ये कंपनीचे सरासरी क्लायण्ट फंडिंग बुक चालू वार्षिक १९.८ टक्क्यांच्या वाढीसह १६.३१ बिलियन रूपयांपर्यंत पोहोचले.

Advertisement

Advertisement

चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी याबाबत म्हणाले की, “सध्या अस्थिर वातावरण आहे. असे असताना देखील लोकांची भांडवल बाजारपेठांमधील रूची वाढत आहे. या तिमाहीमध्ये प्रचंड यश संपादित केले, जेथे आमच्या ग्राहकवर्गाने १० दशलक्षचा टप्पा पार केला आहे. कंपनी सुपर अॅपच्या लाँचसह आम्ही आमच्या ग्राहकांना प्रगत संपत्ती निर्मितीचा अनुभव देण्यास उत्सुक आहोत.”

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply