Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Pune Education: पुणे कृषि महाविद्यालयाच्या टीमने मिळवले भरघोस यश; पहा कोणती दमदार कामगिरी केलीय त्यांनी

Please wait..

Pune Education : अहमदनगर : राहुरी येथील महात्मा फुले कृषि विद्यापीठांतर्गतच्या पुणे कृषि महाविद्यालय येथील कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयात पदवी शिक्षण घेत असलेले विद्यार्थी तामिळनाडू राज्यातील कोईमतूर येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय व्यवस्थापन स्पर्धा 2022 मध्ये सहभागी झाले होते. यामध्ये पुणे कृषि महाविद्यालय टीमला तृतीय क्रमांकाचे पारितोषक मिळाले आहे. (Students pursuing degree in Agribusiness Management College at Pune Agricultural College under Mahatma Phule Agricultural University at Rahuri had participated in the National Management Competition 2022 held at Coimbatore in the state of Tamil Nadu. In this, Pune Agricultural College team has got the third prize.)

Advertisement

Advertisement
Loading...

सदर बैठकीत प्रबंदाज 2022 घटकांतर्गत व्यवसाय नियोजक म्हणून शांकीकुमार आणि कृष्णा देशमुख यांनी द्वितीय क्रमांकाचे पारितोषक मिळविले आहे. उत्तम व्यवस्थापक म्हणून अमित पाटील आणि मनुष्यबल व्यवस्थापन स्पर्धेत श्रेया फडतरे आणि आकाश क्षीरसागर यांनी तृतीय क्रमांकाचे पारितोषक मिळविले आहे. तामिळनाडू कृषि विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. व्ही. गीतालक्ष्मी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांच्या यशाबद्दल आणि शिस्तबद्ध वागणुकीबाबत विशेष कौतुक केले आणि शुभेच्छा दिल्या आहेत. सदर स्पर्धामध्ये विजेत्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना कृषी महाविद्यालय, पुणेचे सहयोगी अधिष्ठाता तथा प्राचार्य डॉ. सुनील मासळकर, कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. संजय भोसले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल सहभागी स्पर्धकांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील, संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख व अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी अभिनंदन केले.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply