Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Sri Lanka Crisis : श्रीलंकेच्या पंतप्रधानांचे धक्कादायक वक्तव्य.. सांगितले कर्जाचे गणित; जाणून घ्या..

Sri lanka : श्रीलंकेतील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट (Sri Lanka Crisis) होत चालली आहे. अन्नाबरोबरच लोकांना औषधे आणि पेट्रोल-डिझेलसाठीही संघर्ष करावा लागत आहे. दरम्यान, बुधवारी, श्रीलंकेचे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे (ranil wickremesinghe) म्हणाले, की श्रीलंका (Sri Lanka) दिवाळखोरीत आहे. कारण देश दशकातील सर्वात वाईट आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि लाखो लोकांना अन्न, औषध आणि इंधन खरेदी करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

Advertisement

CNN च्या वृत्तानुसार, विक्रमसिंघे यांनी खासदारांना सांगितले की, देशाची कोलमडलेली अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (International Monetary Fund) सोबत वाटाघाटी करणे कठीण आहे. कारण 2.2 कोटी लोकसंख्या असणाऱ्या या देशाने एक विकसनशील देशाऐवजी एक दिवाळखोर देश म्हणून वाटाघाटी करण्यासाठी सुरूवात केली आहे.

Advertisement

श्रीलंकेचे पंतप्रधान संसदेत म्हणाले, की आता आपण दिवाळखोर देश (bankrupt Country) म्हणून चर्चेत सहभागी होत आहोत. त्यामुळे आधीच्या वाटाघाटींच्या तुलनेत आम्हाला अधिक अडचणी आणि गुंतागुंतीच्या परिस्थितीचा सामना करावा लागतो. दिवाळखोरीच्या परिस्थितीमुळे, आपल्याला आयएमएफसमोर वेगळ्या पद्धतीने अडचणी सांगाव्या लागल्या आहेत जे अत्यंत जटील आहे.

Loading...
Advertisement

श्रीलंका सात दशकांतील सर्वात वाईट आर्थिक संकटातून जात आहे. परकीय चलनाच्या साठ्यात विक्रमी घसरण झाल्याने देशाची आर्थिक स्थिती कोलमडली आहे. देशात अन्न, औषध, इंधन (Fuel) यासह जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. देशात शाळा (School Closed In Sri Lanka) बंद करण्यात आल्या आहेत, इंधन पुरवठा (Fuel Supply) मर्यादित करण्यात आला आहे. कोलंबोसह अनेक शहरांमध्ये लोकांना इंधनासाठी अनेक दिवस वाट पाहावी लागत आहे.

Advertisement

Sri Lanka Crisis : श्रीलंकेतील आर्थिक संकट आजही कायम, भारताने श्रीलंकेला पुन्हा दिली ‘ही’ मदत

Advertisement
Advertisement

Leave a Reply