Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IMD: ‘या’ भागात पडणार मुसळधार पाऊस; IMD ने दिला मोठा इशारा

Please wait..

IMD: भारतीय हवामान खात्याने (IMD) पावसाबाबत अलर्ट (Rain Alert) जारी केला आहे. दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. याशिवाय आकाश ढगाळ राहू शकते. मान्सूननेही (Monsoon) जवळपास संपूर्ण भारतात (India) दार ठोठावले आहे. यावेळी मान्सून वेळेआधी दाखल झाला आहे. त्यामुळे पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. तापमानातही घट झाली आहे. हवामान खात्याने (IMD) अंदाज व्यक्त केला आहे की आज दिल्ली, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कोकण, गोवा आणि इतर अनेक राज्यांमध्ये पाऊस पडू शकतो. हवामान खात्याने आज (मंगळवार) दिल्लीसाठी यलो अलर्ट जारी केला आहे, तर कोकणात पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
हवामान खात्याने दिल्लीत मंगळवारसाठी ‘यलो’ आणि बुधवारी ‘ऑरेंज’ अलर्ट जारी केला आहे, ज्या अंतर्गत मध्यम ते मुसळधार पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. IMD ने आज (मंगळवार) हलका ते मध्यम पाऊस किंवा गडगडाटासह ढगाळ आकाशाचा अंदाज वर्तवला आहे. आज कमाल तापमान 36 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

येथे पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे
भारतीय हवामान खात्याने पुढील 5 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केल्यानंतर, NDRF च्या दोन तुकड्या कोकणात, महाराष्ट्रात तैनात करण्यात आल्या आहेत. अधिकाऱ्याने सांगितले की, एनडीआरएफची एक टीम रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे तर दुसरी टीम रायगड जिल्ह्यातील महाड येथे तैनात करण्यात आली आहे. 4 जुलै ते 8 जुलै दरम्यान विविध भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. IMD नुसार रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

मध्य प्रदेशातील 15 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
विशेष म्हणजे IMD ने मध्य प्रदेशातील 15 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. IMD ने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पुढील दोन दिवस मध्य प्रदेशातील काही भागात मध्यम ते मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. IMD च्या भोपाळ केंद्राचे वैज्ञानिक सहाय्यक शक्ती सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील मोठ्या भागात पाऊस पडत आहे. ते म्हणाले, ‘मान्सूनने 1 जुलै रोजी संपूर्ण मध्य प्रदेशात दस्तक दिली. राज्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा 11 टक्के कमी पाऊस झाला आहे. 1 जून ते 4 जुलै दरम्यान 147.1 मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर या कालावधीतील सरासरी सरासरी 164.7 मिमी आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply