Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

M.S. Dhoni: धोनीमुळे ‘हे’ दमदार खेळाडू निवृत्त झाले! जाणुन घ्या डिटेल्स

Please wait..

M.S. Dhoni:  महेंद्रसिंग धोनी (M.S. Dhoni) त्याच्या करिष्माई कर्णधारपदासाठी प्रसिद्ध आहे. त्याने टीम इंडियाला (Team India) टी-20 विश्वचषक, विश्वचषक 2011 आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून दिली. त्याच्या मुकुटात अनेक रत्ने कोरलेली आहेत. धोनीने आपल्या कर्णधारपदाखाली अनेक युवा खेळाडूंचे करिअर वाचवले. धोनी नेहमीच धक्कादायक निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध आहे. टी-20 विश्वचषकात जोगिंदर शर्माला शेवटची षटकं देणं असो किंवा रविचंद्रन अश्विनला चॅम्पियन्स ट्रॉफीमधली शेवटची षटकं देणं असो. त्याच्या प्रत्येक निर्णयाने टीम इंडियाला विजय मिळवून दिला आहे. मात्र काही खेळाडूंनी त्याच्यामुळे क्रिकेटला राम राम देखील ठोकले आहे.

Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement
Loading...

1. वीरेंद्र सेहवाग
वीरेंद्र सेहवाग हा जगातील सर्वात धोकादायक सलामीवीर मानला जातो. त्याच्यासमोर गोलंदाज आले की हादरायचे. सेहवाग चौकार मारण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. कोणत्याही खेळपट्टीवर विकेट घेण्याची क्षमता सेहवागमध्ये होती. सेहवागने भारतीय संघासाठी 100 कसोटी सामन्यांमध्ये 23 शतकांसह 8556 हून अधिक धावा केल्या आहेत, परंतु खराब फॉर्ममुळे त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले. यानंतर तो निवृत्त झाला, पण अनेक मुलाखतींमध्ये सेहवागने महेंद्रसिंग धोनीवर अनेक आरोप केले.

Advertisement

Advertisement

2. गौतम गंभीर
भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत भारताला अनेक मोठे यश मिळवून दिले. 2007 च्या T20 विश्वचषकात त्याने 75 धावा केल्या होत्या. त्याचवेळी 2011 मध्ये झालेल्या 50 षटकांच्या विश्वचषकात गंभीरने आपल्या बॅटने 97 धावा केल्या होत्या. त्याच्यामुळेच भारत जगज्जेता होऊ शकला. पण याचं श्रेय त्याला जेवढं मिळायला हवं होतं तेवढं कधीच दिलं गेलं नाही. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली गौतम गंभीरकडे नेहमीच दुर्लक्ष झाले.

Advertisement

Advertisement

3. पार्थिव पटेल
पार्थिव पटेलने 2022 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पण केले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे 17 वर्षे होते. तो महेंद्रसिंग धोनीच्या आधी टीम इंडियात आला होता. मात्र धोनीचे स्थान निश्चित झाल्यानंतर या खेळाडूला भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही. पटेलने 2020 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीनंतर पार्थिव पटेलने समालोचक म्हणून डावाला सुरुवात केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply