Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Water Supply : बाब्बो.. चक्क पावसाळ्यात राज्यात सुरू आहेत ‘इतके’ टँकर.. पहा, किती गावांना मिळतेय टँकरचे पाणी..

Please wait..

मुंबई – जिल्ह्यासह राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडत आहे. खरीप हंगामातील पेरण्यांनी वेग घेतला आहे. आगामी काळातही पाऊस (Rain) होण्याचा अंदाज आहे. असे असले तरी अजूनही काही ठिकाणी समाधानकारक पाऊस पडलेला नाही. या ठिकाणी आजही लोकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. त्यामुळे प्रशासनाला या लोकांना टँकरद्वारे पाणीपुरवठा (Tanker Water Supply) करावा लागत आहे. आजमितीस राज्यातील तब्बल 610 गावे आणि 1266 वाड्या वस्त्यांवरील नागरिकांना 496 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये जवळपास 430 खासगी तर फक्त 66 टँकर सरकारी आहेत.

Advertisement

Advertisement

यंदा देशभरात कडाक्याचा उन्हाळा होता. राज्यातही वेगळी परिस्थिती नव्हती. मात्र, तरीही या काळात पाण्याची फारशी टंचाई जाणवली नाही.  मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात टँकरची संख्या फारशी नव्हती. जून महिन्यात तर मान्सूनने (Monsoon) पदार्पण केले. त्यामुळे  आताही पाण्याची टंचाई फारशी जाणवत नाही. जून महिन्यात पंधरा दिवस पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे  खरीप हंगामातील पेरण्या संकटात सापडल्या होत्या.  या काळात फार पाऊस पडला नाही. त्यामुळे मूग आणि अन्य पिकांवर परिणाम झाला.  आता मात्र पाऊस सुरू असल्याने पेरण्या वेगात होत आहेत.

Advertisement

Advertisement

दुसरीकडे राज्यात काही ठिकाणी अजूनही पाणी टंचाई जाणवत आहे. नगर जिल्ह्यात 29 टँकरद्वारे 72 हजार लोकांना पाणीपुरवठा केला जात आहे. तसेच राज्यातील अन्य जिल्ह्यात टँकरने पाणी दिले जात आहे.  सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, उस्मानाबाद, लातूर, अकोला, वर्धा,  गोंंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली हे जिल्हे वगळता बाकी सर्व जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात टँकर सुरू आहेत. यामध्ये ठाणे 32, रत्नागिरी 17, पालघर 30, नाशिक 67, धुळे 2, नंदूरबार 1, जळगाव 11, नगर 29, पुणे 61, सातारा 11, सांगली 4, औरंगाबाद 5, जालना 43, बीड 8, परभणी 1, हिंगोली 20, नांदेड 17, अमरावती 27, वाशिम 8, बुलढाणा 28 आणि यवतमाळ जिल्ह्यात 29 टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे.  दरम्यान, मागील आठवड्यात टँकरची संख्या 527 होती. आता मात्र ही संख्या कमी आहे.

Advertisement

अशी आहे परिस्थिती..

Advertisement

एकूण टँकर 496

Advertisement
Loading...

सरकारी टँकर 66

Advertisement

खासगी टँकर 466

Advertisement

एकूण गावे 610

Advertisement

एकूण वाड्या वस्ती 1266

Advertisement

अर्र.. फ़क़्त करोनाच नाही, तर राज्यावर आलेय हेही परंपरागत संकट..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply