Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

New Rules: तुमची महत्त्वाची कामे ताबडतोब करा पूर्ण; ‘हे’ नियम बदलणार, नाहीतर बिघडणार तुमचा बजेट

New Rules:  देशात दररोज काही बदल होत आहेत. त्याचबरोबर जून 2022 नंतरही काही नियम (Rules) बदलणार आहेत. या बदलांमुळे काही लोकांच्या खिशावरही परिणाम होऊन बजेटही विस्कळीत होऊ शकते. तसेच काही कामे 30 जूनपर्यंत पूर्ण केली तर बरे, अन्यथा दंडही होऊ शकतो.

Advertisement

आधार कार्ड- पॅन कार्ड लिंकिंग
जर पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक नसेल तर 30 जून ही शेवटची तारीख आहे. जर 30 जूनपर्यंत आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक केले नाही तर अशा लोकांना दंड होऊ शकतो. जुलै महिन्यापासून आधार पॅनशी लिंक केल्यास 1000 रुपये दंड आकारला जाईल.

Advertisement

स्वयंपाकाच्या गॅसची किंमत
एलपीजी ही घरातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जाते. त्याच्या किमती वाढल्याने संपूर्ण घराचे बजेट बिघडू शकते. त्याचवेळी 1 जुलैपासून एलपीजी गॅसच्या किमती वाढू शकतात, असे मानले जात आहे. वास्तविक, घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी गॅसची किंमत दर महिन्याच्या पहिल्या तारखेला निश्चित केली जाते. याचा मोठा परिणाम गॅसच्या दरावर होत आहे. त्याचवेळी गॅसच्या दरात वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

डीमॅट खात्याचे केवायसी
तुम्ही शेअर्स खरेदी आणि विक्री करत असाल तर तुमचे डिमॅट खाते असणे आवश्यक आहे. डीमॅट खातेधारकांना आता 30 जूनपर्यंत त्यांचे ट्रेडिंग खाते केवायसी करणे आवश्यक आहे. त्याच वेळी, खात्याचे केवायसी न केल्यास खाते कायमचे बंद केले जाऊ शकते. खाते कायमचे बंद केल्यास त्या खात्यातून शेअर्सची खरेदी-विक्री होणार नाही.

Advertisement

मालमत्तेवर कर सूट
मालमत्तेवर करमाफीची योजना फक्त दिल्लीतील लोकांसाठी आहे. या अंतर्गत दिल्लीतील लोकांनी 30 जूनपर्यंत मालमत्ता कर जमा केल्यास त्यांना 15 टक्के सूट मिळेल. मात्र, 1 जुलैपासून लोकांना ही सवलत मिळणार नाही.

Advertisement
Advertisement

Leave a Reply