Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Maharashtra Political Crisis Live Updates : ‘मी पुन्हा येईन’लाही झटका..! पहा ठाकरेंनी काय निर्णय घेतलाय दणक्यात

Please wait..

मुंबई : सध्या महाराष्ट्र राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (BJP Devendra Fadanvis) आलेले आहेत. भाजपच्या नेतृत्वाचा आणि राज्य भाजपचा त्यांच्यावर विश्वास आहे. तसेच राज्यसभा (Rajyasabha) आणि विधान परिषद (MLC Election) निवडणुकीत त्यांनी आपला करिष्मा दाखवल्याने त्यांची ‘मी पुन्हा येईन’ ही घोषणा चर्चेत आहे. अशावेळी मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thakeray) यांना शह देताना फडणवीस यांची मदत घेतल्याचे म्हटले जात आहे. मात्र, सकाळपासून सुरू असलेल्या या राजकीय नाटकामध्ये आता मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्या पद्धतीने रंग भरण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

या घटनाक्रमामुळे शिवसेनेने विधिमंडळ पक्षनेतेपदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला असून, शिवडीचे आमदार अजय चौधरी यांची शिवसेना विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली आहे. सूत्रांनी ही माहिती दिली आहे. याच्या बातम्या व्हायरल होत आहेत. तर, शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आहोत, असे लिहिले आहे. बाळासाहेबांनी आपल्याला हिंदुत्व शिकवले आहे. त्यांच्या विचारांमुळे आणि आनंद दिघे साहेबांच्या शिकवणुकीमुळे सत्ता मिळवण्यासाठी आम्ही कधीही फसवणूक केली नाही आणि कधीही हार मानणार नाही, असेही म्हटले आहे.

Advertisement

Advertisement

महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांवर वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले की काहीही बोलणे खूप घाईचे आहे, सध्या आम्ही वाट पाहत आहोत आणि परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. एकनाथ शिंदे यांनी ना भाजपला सरकार स्थापनेचा प्रस्ताव पाठवला आहे, ना भाजपने त्यांना कोणताही प्रस्ताव पाठवला आहे. एकूणच सध्या फडणवीस हेही दिल्लीत आहेत. अशावेळी मुख्यमंत्री ठाकरे आक्रमक झाल्याने भाजपची पळपळ सुरू झाली आहे. आता एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातमधील सुरत येथे तळ ठोकून बसल्याची घटना समोर आल्यानंतर महाराष्ट्रातील राजकीय संकट अधिकच गडद झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही आमदारांची तातडीची बैठक घेतली. शिवसेना आज दुपारी ४ वाजता शक्तीप्रदर्शन करणार आहे. शिवसेना थोड्याच वेळात शक्ती दाखवून देणार आहे. मग ‘मी पुन्हा येईन’ या घोषणेचे काय होणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. (The political crisis in Maharashtra has deepened after the incident of Eknath Shinde camping in Surat, Gujarat along with his supporting MLAs. Meanwhile, CM Uddhav Thackeray also held an emergency meeting with the MLAs. Shivsena will demonstrate power at 4 pm today. Shivsena will show power in a while.)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply