Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

President Election 2022 Updates: अखेर ठरले की..; ‘ते’ असतील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार

Please wait..

मुंबई : जुलैमध्ये देशाला नवे राष्ट्रपती मिळणार आहेत. अशा स्थितीत विरोधी पक्ष आणि सत्ताधारी भाजपकडून संभाव्य उमेदवारांच्या नावांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. भाजपने अद्याप आपले पत्ते उघडले नसले तरी विरोधी पक्षातून आतापर्यंत चार नावे समोर आली आहेत. मात्र, त्यांनी सर्वांची निराशा केली आहे. दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे माजी नेते यशवंत सिन्हा यांच्या एका ट्विटमुळे राष्ट्रपती निवडणुकीची उत्कंठा वाढली आहे. आता तेच उमेदवारी करण्यासाठी इच्छुक असल्याने भाजपसमोर मोठे आव्हान उभे राहण्याची शक्यता आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

दरम्यान, माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या ट्विटने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, राज्यसभा आणि त्यानंतर विधानपरिषद निवडणुकीत टीएमसीला मिळालेल्या सन्मान आणि प्रतिष्ठेबद्दल मी ममता बॅनर्जींचा आभारी आहे. आता वेळ आली आहे की, पक्षापासून दूर राहून, एका मोठ्या राष्ट्रीय हेतूसाठी मी मोठ्या विरोधी एकजुटीसाठी काम केले पाहिजे. यशवंत सिन्हा यांनी भाजपमधून टीएमसीमध्ये प्रवेश केला होता. त्यांच्या या ट्विटनंतर ते विरोधी पक्षाकडून राष्ट्रपतीपदाचे उमेदवार असू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Advertisement

Advertisement

राजकीय विश्लेषकांच्या मते, सिन्हा यांचे नाव पुढे करणे ही एक धोरणात्मक वाटचाल असू शकते. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकारणातील फरक त्यांच्या माध्यमातून विरोधकांना अधोरेखित करायचा आहे. यशवंत सिन्हा हे अटलबिहारी सरकारमध्ये मंत्री होते आणि माजी पंतप्रधानांचे विश्वासू सहकारी होते. गेल्या वर्षी त्यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) नेते सीताराम येचुरी यांचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी आगमन झालेले आहे. राष्ट्रपती निवडणुकीच्या रणनीतीबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या निवासस्थानी १७ पक्षांच्या विरोधी पक्षनेत्यांची बैठक सुरू झाली आहे. सीपीआय नेते डी राजाही पवारांच्या दिल्लीतील निवासस्थानी पोहोचले आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply