Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

World Political News: बाब्बो.. अखेर पडले सरकार..! ऑक्टोबरमध्ये निवडणुकीची तयारी

Please wait..

मुंबई : इकडे भारतातील प्रमुख राज्य असलेल्या महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकारचे आमदार गायब झाल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागते की काय असेच चिन्ह आहे. त्यावर देशभरात पैजा झडत आहेत. अशावेळी इस्रायलमध्ये चार वर्षांपेक्षा कमी कालावधीत पाचव्यांदा सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. येथील नफताली बेनेट यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार कोसळले असून देशात मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातही असेच होण्याची शक्यता व्यक्त करून सोशल मिडीयामध्ये चर्चा सुरू झाली आहे.

Advertisement

Advertisement

आता इस्रायलमध्ये ऑक्टोबरच्या अखेरीस निवडणुका होऊ शकतात. इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्याशी झालेल्या करारानुसार परराष्ट्र मंत्री यायर लॅपिड येत्या काही दिवसांसाठी देशाची सत्ता हाती घेतील. माजी पंतप्रधान आणि विद्यमान विरोधी पक्षनेते बेंजामिन नेतान्याहू यांनी पुन्हा सत्तेत येण्याचे मनसुबे व्यक्त केले आहेत. सोमवारी नफ्ताली बेनेट आणि यायर लॅपिड यांनी संसद विसर्जित करण्याचे मान्य केले. इस्रायलची सत्ताधारी युती तुटण्याची शक्यता गेल्या अनेक आठवड्यांपासून वर्तवली जात होती. एका संयुक्त निवेदनात, बेनेट आणि लॅपिड यांनी त्यांच्या पक्षांमधील युती तुटल्याची माहिती दिली. हे दोघे संसद विसर्जित करण्यासाठी विधेयक घेऊन येतील आणि ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची अपेक्षा आहे, असे त्यात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Loading...

बेनेट आणि लॅपिड यांच्यात एक करार झाल्यावर नेतान्याहू यांना सत्तेवरून पायउतार व्हावे लागले होते. कराराच्या अंतर्गत सध्याचे परराष्ट्र मंत्री काळजीवाहू पंतप्रधान राहतील. म्हणजे पुढील महिन्यात इस्रायलच्या दौऱ्यावर येणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांचे स्वागत बेनेटऐवजी लॅपिडकडून होणार आहे. इस्रायलचे राजकीय गणित खूप मनोरंजक आहे. बेनेट सरकारला विरोधी पक्षांपेक्षा फक्त एक जागा जास्त होती. नेतन्याहू सत्तेवर येण्यासाठी सतत हेराफेरी करण्यात गुंतले होते. महायुतीत सहभागी असलेल्या खासदारांना फोडण्याचा त्यांचा सातत्याने प्रयत्न होता. इस्रायलचा अरब पक्ष सत्ताधारी आघाडीचा भाग होता पण सरकारवर नाराज होता. पॅलेस्टिनी प्रदेशात ज्यूंचे पुनर्वसन केले जात असल्याचा आरोप पक्षाने केला. एकूणच महायुती सरकारमध्ये ज्या पद्धतीने माजी मुख्यमंत्री आताही विरोधी पक्ष म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत तसाच प्रकार इस्रायलमध्ये होत असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळेच इथेही फडणवीस यांना यश येण्याची शक्यता काहींना वाटत आहे.

Advertisement

Advertisement

(Summery : Mumbai: With the disappearance of MLAs from the Mahavikas Aghadi government in Maharashtra, a major state in India, there is a sign that Chief Minister Uddhav Thackeray has to step down. Paijas are falling on it all over the country. This is the fifth general election in less than four years in Israel. The coalition government led by Naftali Bennett has collapsed and a major political crisis has erupted in the country. Therefore, discussions have started on social media expressing the possibility of the same happening in the state of Maharashtra.)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply