Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Goat Farming Marathi Info : छोट्या करडांना बाळसुग्रास देऊन घ्या काळजी; कारण ते गणित आहे नफ्याचे

Please wait..

व्यवसायाचे एक गणित (Business calculation) असते. त्याला त्याच नियमांचा आधार देऊन यशस्वी करता येते. हा, यशस्वी काही नियम नाही. मात्र, व्यवस्थापनाचे (management tips in marathi)  काही नियम असतात आणि ते आपापल्या पद्धतीने फॉलो करूनच व्यवसायात किंवा कोणत्याही क्षेत्रात  यश मिळते. शेळीपालक (goat farmer) म्हणून आपल्या सगळ्यांना असाच एक महत्वाचा नियम लक्षात ठेवावा लागतो. तो म्हणजे या व्यवसायाचे गणित कराडांच्या विक्रीवर अवलंबून आहे. करडे विकूनच या व्यवसायाची परतळ बसते.

Advertisement

Advertisement

सोप्या शब्दांत सांगायचे तर फळबागेत (horticulture) ज्या पद्धतीने फळांची विक्री करून नफा मिळतो, किंवा फुलशेतीत (flower farming) फुलांच्या विक्रीतून. तशाच पद्धतीने शेळीपालन (goat farming) व्यवसायातील विक्री करून नफा मिळवण्याचे साधन अर्थात फुल किंवा फळ म्हणजे करडे आहेत. याच भाषेत राहुरी (MPKV, Rahuri) येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे संशोधक याबाबतीत समजावून सांगतात. आणि महत्वाचे म्हणजे हे १०० टक्के सत्य आहे. त्यामुळेच ९-१० महिन्यात १८-२० किलो वजनाचे करडू बोकड किंवा पाठ बनवून विकण्याचा हा व्यवसाय आहे.

Advertisement

Advertisement

नवजात करडांची काळजी तर घ्यावीच लागते. मात्र, शेळीच्या पोटात असतानाही त्यांचे संगोपन व्यवस्थित होऊन बाळसेदार करडू जन्माला येण्यासाठीचे आहार नियोजन करावे लागते. करडू जन्माला आल्याबरोबर लगोलग अर्ध्या तासाच्या आत त्याला एकूण वजनाच्या १० टक्के इतका चिक (कोवळे दुध) पाजावे. हे चिक म्हणजे कराडचे कवचकुंडल आहेत. चीकामुळे (milk) कराडांची रोगप्रतिकार शक्ती (इम्युनिटी पॉवर) वाढते. नंतरही कराडांना पहिले पंधरा दिवस रोज ४ ते ५ वेळा दुध पिण्यासाठी सोडावे. प्रत्येकवेळी वजनाच्या १०-१५ टक्के इतके दुध पिऊ द्यावे. पंधरवडा उलटून गेल्यावर मगच कराडांना सुकलेला चारा चघळू द्यावा.

Advertisement

Advertisement
Loading...

सुरुवातीला वीस दिवसांनी एका करडास ३०-५० ग्रॅम बाळसुग्रास खुराक द्यावा. बाळसुग्रास म्हणजे सरासरी २० टक्के पचनीय कच्ची प्रथिने आणि ७० टक्के पचनीय पदार्थ यांचे मिश्रण असते. चार किलो वजनाच्या करडाला ५० ग्रॅम आणि त्यापुढील प्रतिकिलोसाठी ५० ग्रॅमने वाढवून नेऊन ३०० ग्रॅमपर्यंत याचे प्रमाण वाचवावे. त्यामध्ये पुढील घटक वापरावेत.

Advertisement
  • मक्याचा भरडा २०%
  • डाळ चुनी २०%
  • भुईमुग पेंड ३५%
  • गव्हाचा कोंडा २२%
  • क्षार मिश्रण २%
  • मीठ १%
  • आज आपण पहिल्या ३ महिन्यात कराडांचे संगोपन कसे करावे हे पाहिले. पुढील भागात आपण ३ ते ९ महिने वयाच्या कराडांना कोणता आहार द्यावा व कोणती काळजी घ्यावी हे अभ्यासणार आहोत.

संपादन व लेखन : सचिन मोहन चोभे (क्रमशः)

Advertisement

Advertisement

वाचक बंधू-भगिनींनो, आपण ‘कृषीरंग’वर दररोज शेळीपालन (Goat Farming) या विषयावरील माहितीची मालिका प्रसिद्ध करणार आहोत. यामध्ये महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थितीसह जगभरातील गोट फार्मिंग ट्रेंड आणि संशोधन याबाबतची माहिती आपण घेणार आहोत. सध्या या व्यवसायाला ‘अच्छे दिन’ आल्याच्या बातम्या माध्यमांतून येतात. अशावेळी या व्यवसायाचे वास्तव आणि व्यावहारिक भान देण्याचा हा प्रयत्न आहे. आपणास कोणत्याही सूचना व मार्गदर्शन करावेसे वाटल्यास krushirang@gmail.com या इमेलद्वारे आपण आम्हाला संपर्क करू शकता. तसेच नियमित बातम्यांचे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय न्यूज अपडेट आणि कृषी-ग्रामीण विकासाची माहिती पाहण्यासाठी आमचे www.facebook.com/Krushirang (कृषीरंग) हे फेसबुक पेज लाईक व फॉलो करा. ही माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना माहितीसाठी शेअर करा. @टीम कृषीरंग

Advertisement
Advertisement

Leave a Reply