Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Bharat band; ‘त्या’ प्रकरणात आज भारत बंद; अनेक जिल्हयात इंटरनेट बंद, जाणुन घ्या डिटेल्स

Bharat band; केंद्र सरकारच्या (Central government) नव्या सैन्य भरती (Army Requirment) अग्निपथ योजनेच्या (Agneepath Yojana) विरोधात गेल्या काही दिवसांपासून देशभरात निदर्शने सुरू आहेत. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटनाही समोर आल्या आहेत. अग्निपथ योजनेच्या विरोधात आज अनेक संघटनांनी भारत बंदची घोषणा केली आहे. हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज अनेक ठिकाणी शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. याशिवाय इंटरनेट सेवाही विस्कळीत होणार आहे.

Advertisement

राजधानी दिल्लीला लागून असलेल्या उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. भारत बंद लक्षात घेऊन राज्य सरकारांनी सुरक्षा व्यवस्था वाढवली आहे. आरएएफ आणि जीआरपीला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे. यासोबतच हिंसाचार करणाऱ्या आंदोलकांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना सुरक्षा दलांना देण्यात आल्या आहेत.

Advertisement

दिल्ली, राजस्थान, पंजाब आणि हरियाणामध्ये कलम 144 पोलिसांचा इशारा
भारत बंद दरम्यान दिल्ली एनसीआरमध्ये निदर्शने होण्याची शक्यता पाहता पोलीस प्रशासन सतर्क आहे. नोएडामध्ये कलम 144 लागू करण्यात आले आहे. यासोबतच सोशल मीडियावरही विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात आज होणाऱ्या संभाव्य भारत बंदच्या पार्श्वभूमीवर राजस्थान, पंजाब आणि हरियाणा पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचबरोबर पंजाबमधील सर्व प्रमुख लष्करी प्रशिक्षण संस्थांच्या आसपास सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. त्याचबरोबर राजस्थान आणि हरियाणामध्येही सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Loading...
Advertisement

आपल्या ‘तिच्या’ हातांची काळजी आहे ना..? मग https://bit.ly/34DPYzN यावर क्लिक करून पीजन चॉपर पहा अन आवडला तर भेट द्या किंवा खरेदी करा

Advertisement

बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद
भारत बंद दरम्यान बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. अग्निपथ योजनेच्या विरोधात या जिल्ह्यांमध्ये हिंसाचार झाला. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही आजचा जनता दरबार रद्द केला आहे. राज्यातील कैमूर, भोजपूर, औरंगाबाद, रोहतास, बक्सर, नवादा, पश्चिम चंपारण, समस्तीपूर, लखीसराय, बेगुसराय, वैशाली, सारण, मुझफ्फरपूर, मोतिहारी, दरभंगा, गया, मधुबनी, जेहानाबाद, खगरिया आणि शेखपुरा जिल्ह्यात इंटरनेट बंद राहणार आहे.

Advertisement

केरळमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था
केरळचे पोलीस महासंचालक (DGP) म्हणाले की, आज भारत बंद दरम्यान हिंसाचारात किंवा सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला अटक करण्यासाठी संपूर्ण दल कर्तव्यावर असेल. केरळमधील जिल्हा पोलीस प्रमुखांना सक्तीने व्यवसाय बंद करण्यापासून रोखण्यासाठी आणि न्यायालये, राज्य विद्युत मंडळ (KSEB) आणि रस्ते वाहतूक महामंडळ (KSRTC) तसेच सरकारी कार्यालये आणि संस्थांना सुरक्षा प्रदान करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisement
Advertisement

Leave a Reply