Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Bajara Farming : बाजरीतून मालामाल होण्याची संधी..! पहा नेमके काय करावे लागेल यासाठी

Please wait..

सोलापूर : बाजरीचा ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम (योजना) आणि पाणी व्यवस्थापनाविषयी महत्वाची माहिती; उत्पादनवाढीसाठी कामी येतानाच याद्वारे सरकारी योजनेचा लाभ घेऊन अधिकचे अर्थार्जन करणे हेही शक्य आहे. यासाठी चालू खरीप हंगामात आपण आपल्या भागातील तालुका कृषी अधिकारी किंवा गावातील कृषी सहायक यांच्याकडे संपर्क साधावा. कारण या सर्व योजनांची अंमलबजावणी त्यांच्याकडूनच केली जाते.

Advertisement

राज्यात यंदा मान्सून चांगला होईल अशा अंदाज व्यक्त होत असल्याने शेतकर्यांंची अडचण नको म्हणून आता कृषी विभागाने खरीप हंगामाची जोरदार तयारी सुरु केली आहे. तर महाराष्ट्रात काही ठिकाणी चांगला पाऊस होऊन गेल्याने शेतकऱ्यांनी मशागत देखील सुरू केली आहे. तर, बहुसंख्य भागात यंदा वेळेवर पाउस न झाल्याने बाजरीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. अशावेळी खरिपात बाजरी, तूर, मूग, उडीद, सोयाबीनच्या बियाणांची अधिक मागणी असते. त्यामुळे आता आपण ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम काय असतो? तसेच पाणी व्यवस्थापनाविषयी महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत. 

Advertisement
Loading...

बाजरी पिकाच्या शिफारस केल्या गेलेल्या एकाच संकरित वाणाचे बिजोत्पादन एकाच गावात राबविल्यास त्यास ग्रामबिजोत्पादन असे म्हणतात. या करिता गावातील सर्व बाजरी पिकविणाऱ्या शेतकऱ्यांनी एकत्रितपणे विचार करून एकाच संकरित वाणाच्या नर व मादी वाणांचे पायाभूत बियाणे विद्यापीठाकडून मिळवावे व बीज प्रमाणिकरण यंत्रणेकडून बिजोत्पादन कार्यक्रमाची नोंदणी करावी. वेळोवेळी प्रमाणीकरण अधिकाऱ्याकडून मार्गदर्शन घेऊन शुध्द बियाणे तयार करता येऊ शकते. त्यामळे शेतकऱ्यांना शुध्द बियाणे तर मिळतेच शिवाय बिजोत्पादनात साधारण बाजरी उत्पादनापेक्षा जास्त निव्वळ नफा मिळतो. खरीप बाजरी पिकास २५ ते ३० हेक्टर सेमी आणि उन्हाळी बाजरीस ३५ ते ४० हेक्टर सेमी पाण्याची गरज असते. बाजरी ओलिताखाली घ्यावयाची असल्यास पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी) दुसरे पाणी पोटरीत असतांना (पेरणीनंतर ३५ ते ४५ दिवसांनी) आणि तिसरे पाणी दाणे भरतेवेळी (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.

Advertisement

Advertisement

(English Summery: Solapur Maharashtra : Important Information on Bajra Village Seed Production Program scheme and Water Management; It is also possible to earn more by taking advantage of government schemes while working for increased productivity. For this, during the current kharif season, you should contact the taluka agriculture officer in your area or the village agricultural assistant. Because all these schemes are implemented by them.)

Advertisement
Advertisement

Leave a Reply