Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Blog | आणि ती मॉनिटर झाली महिला आयोगाची अध्यक्ष; वाचा प्रेरणादायी स्टोरी

ती शाळेची मॉनिटर होती; आता ‘राज्य महिला आयोगाची मॉनिटर आहे’…..

Advertisement

कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लावलेल्या वटवृक्षाच्या सावलीत शिकलेली मुलंच लौकिक गाजवत आहेत असे नाही! तर मुली सुद्धा आपल्या आपल्या क्षेत्रात कर्तृत्वाच्या जोरावर ठसा उमठवण्याचे काम करत आहेत. रयत शिक्षण संस्थेची मी माजी विद्यार्थिनी आहे असे अभिमानाने मिरवणारी व्यक्ती म्हणून माझ्या पाहण्यात रुपालीताई चाकणकर आहेत. त्यांच्या बहुतांश भाषणात व बोलण्यात हा उल्लेख आढळून येतो.

Advertisement

रूपाली ताईंचे ५ वी ते १२ वी शिक्षण रयतच्या साधना कन्या विद्यालयात झाले. यावेळी साधारणतः १५०० ते २००० विद्यार्थिनी शालेय शिक्षण घेत होत्या. वर्गाच्या मॉनिटर पदाच्या सोबतच शाळेच्या सुद्धा मॉनिटर म्हणून त्या कामकाज बऱ्या पैकी पाहत असत! त्यांना कला, क्रिडा, भाषण अशा कला गुणांच्या सोबतच नेतृत्वाची सवय नकळतपणे त्यांच्या मध्ये रुजली गेली. एक दिवस गप्पांच्या ओघात त्यांनी सांगितले की ” मी १० वी मध्ये असताना १९९६ साली आमच्या शाळेच्या नामविस्तार कार्यक्रमास देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब येणार होते. त्या निमित्ताने शाळेमध्ये सर्वच बाबतीत लगीन घाई सुरू होती. शिक्षक विद्यार्थ्यांच्या नियोजनाची घाई मी जवळून पाहत होते. साहेब येणार आहेत म्हणून स्वागतासाठी शाळेतून ७२ मुलींची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या दिवशी मला शिक्षकांनी सांगितले की तुझं नशीब बलवत्तर आहे! साहेबांचे औक्षण तू करणार आहेस. त्याच दिवशी औक्षण करताना सहज मला वाटलं की आपण पण कधीतरी राजकारण गेले पाहिजे. ही मनात आलेली राजकारणाच्या बद्दलची पहिली भावना असे त्या आवर्जून सांगतात…

Advertisement

रुपाली ताई यांच्या सासू ५ वर्षे नगरसेविका म्हणून पदावर कार्यरत होत्या. याच काळात सासूबाई यांच्या समवेत पहिल्यांदा पुणे महानगरपालिका मध्ये गेल्या तो त्यांचा पहिला राजकीय धडा म्हणावा लागेल. सासूच्या विरुद्ध कमरेला पदर खेचून भांडणाऱ्या काळात; सासूच्या बोटाला धरून राजकीय धडे गिरवणाऱ्या महिला नेत्या म्हणून रुपालीताई समोर आल्या हे फार कमी लोकांना माहिती असेल. तिथून सुरू झालेला प्रवास आजवर अथांग सुरू आहे.

Advertisement

नागर वस्ती बचत गट (नागर वस्ती विकास योजनेच्या माध्यमातून) माध्यमातून धायरी परिसर पिंजून काढत १७५+ बचत गट काढले. महिलांना प्रशिक्षण दिले. काहींचे टाटा मोटर्स सोबत टायप करून दिले. काहींना व्यवसाय उभा करून दिले. तर पुण्यातील पहिली महिलांचे ड्रायव्हिंग स्कूल सुद्धा काढले. यातूनच संघटन वाढत गेले. व कठीण परिस्थितीमध्ये तावून सुलाखून निघालेली महिला प्रदेशाध्यक्षा ही रुपालीताई चाकणकर यांच्या रूपाने पक्षाला मिळाली.

Loading...
Advertisement

मला एका गोष्टीची गंमत वाटते शाळेत साहेबांचे औक्षण करणाऱ्या मुलीने २०२० साली राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा म्हणून शरद पवार साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यात औक्षण केले. ही मजल मारण्यास लागलेला काळ होता तब्बल २६ वर्ष! दुसरा योगायोग तितकाच मजेदार आहे की राज्यात महिला आयोगाची स्थापना शरद पवार साहेब यांनी १९९३ साली केली. त्या पदावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने बसणाऱ्या पहिल्या महिला नेत्या म्हणून सुद्धा रुपालीताई चाकणकर यांना सन्मानाने बसवण्यात आले. कसलाही राजकीय वारसा नसताना सुद्धा त्यांनी गाठलेली उंची ही असामान्य आहे.

Advertisement

ही सावित्रीची लेक बोलकी नाही तर कर्ती सुद्धा आहे हे मागील काही दिवसांत कौटुंबिक प्रसंगातून दाखवून दिले. रुपालीताई यांचे चुलते काही दिवसांपूर्वी वारले! त्यांना अग्नी देताना ताईंनी विधवा प्रथेला विरोध करत मंगळसूत्र तोडण्यास नकार दिला व तुळशीपत्र दवण्याचा पर्याय सांगितल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. एक दोन दिवसांनी दशक्रिया विधी बाबत बातमी कुटुंबातून देण्यात आली. त्यामध्ये सर्व बहिणींच्या नावापुढे सौभाग्यवती लिहिलेलं होते. मात्र एका बहिणीच्या नावासमोर श्रीमती लिहिलेले होते. रुपाली ताईंनी तात्काळ कुटुंबातील सदस्यांना सांगितले की मला विविध कामकाजाच्या, कार्यक्रमाच्या बाबतीत पत्र येतात त्याला श्रीमती लिहिलेले असते. इथे सुद्धा सर्वांना श्रीमती करा किंवा सर्वांना सौभाग्यवती करा! सर्वांना एकच न्याय असला पाहिजे. ही त्यांची भूमिका एक खंबीर महिला लिडर म्हणून दिशादर्शक वाटली.

Advertisement

ही कर्तृत्वाची गाथा; सोडवते महिलांच्या व्यथा.

Advertisement

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा तथा सच्च्या सावित्रीच्या लेकीला Rupali Chakankar यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Advertisement
  • लेखक : गणेश शिंदे सरकार (फेसबुक वरून साभार)

Advertisement

Leave a Reply