यम्मी.. टेस्टी.. हेल्दी.. जवारी काकडी…! परवा मालवणहून कोल्हापूरला येताना नाश्ता करायला एकदम बोगस हॉटेल्स मिळाले. सकाळीच खायची सवय असल्याने मग एका वैभववाडी येथे जाहिरात जास्त अन् सेवा कमी अशा कॅफे चिवा नावाच्या एकदम बकवास हॉटेलमध्ये काहीबाही खाल्ले. पैसेही जास्त गेले आणि वेळेवर व चांगले काहीच न मिळाल्याने विकतचा मनस्ताप पदरी आला. पोटात अर्धकावळे घेऊन मग प्रवास सुरू झाला.
Subsidy Scheme: ‘त्या’ योजनेत मिळते 90 % अनुदान; पहा कसा घ्यायचा लाभ https://t.co/b5CrdTGCRR
Advertisement— Krushirang (@krushirang) May 17, 2022
Advertisement
तर, गगनबावडा सोडल्यावर करवीर तालुक्यात या हिरव्या काकड्या पाहिल्या. अन् चालकाला म्हटले, “गाडी थांबावं. हिरव्या काकड्या आहेत. एकदम चवदार असतात. चल त्यावर आजचा नाश्ता फुल्ल करू..” तो म्हटला, “साहेब, पुढे जाऊन घेऊ की..” मी चेष्टेने म्हटलं, “जर पुढे जाऊन नाहीच भेटल्या तर बिगर लग्नाचा मरशील साल्या..” माझी शापवाणी ऐकून गाडीत हशा पिकला आणि गाडी पाठीमागे फिरली. गाडीतून उरतून मी १४० रुपयांना एक किलो इतक्या माफक भावात या काकड्या घेतल्या. विक्रेत्या ताईनेही गावठी भाषेत याचे महत्त्व सांगून अर्धावरून एक किलो काकडी घ्यायला प्रवृत्त केलं. आणि मीही आनंदाने घेतल्या. आणि आम्हा चौघांचा मस्त सलाड नाश्ता झाला..
Mango News: म्हणून पाण्यात ठेवायचे असतात आंबे; पहा नेमके काय आहे शास्त्रीय कारण https://t.co/cxQGeOSafS
Advertisement— Krushirang (@krushirang) May 12, 2022
Advertisement
ती ताई माझ्या प्रश्नांना उत्तरे देताना माहिती देत होती की, “हिला आम्ही जवारि काकडी म्हणतो. बियाणे आमच्याकडेच असते. मोठ्या झालेल्या काकड्यांचे बियाणे आम्ही धरतो आणि पुढील हंगामात वापरतो. एका काकडीला दोनेक किलो काकड्या येतात. कावळ्या काढल्या तर कमी आणि मोठ्या झाल्या तर यापेक्षाही जास्त. पण कवळी काकडीच ग्राहकांना पाहिजे असते. फवारणी कमी लागते. आम्ही इथेच. आमच्या अडुर गावात (करवीर, ता. कोल्हापूर) रस्त्यावर विकतो. रोज चांगले पैसे मिळतात. पोरं शाळेत जातात. त्यांना शिकवणार आहे. काकडीचा चांगला आधार आहे..”
Pakistan News: मंदिर हल्ल्याप्रकरणी 5 वर्षे शिक्षा..! पहा नेमके काय घडले होते प्रकरण https://t.co/IhSL4L2DAY
Advertisement— Krushirang (@krushirang) May 12, 2022
Advertisement
फवारणी कमी आणि चांगल्या उत्पन्नाची हमी अशीच ही काकडी मला वाटली. इचे शास्त्रीय नाव काय आणि इतर लागवड व्यवस्थापन याबद्दल मीही अज्ञानी आहे. *(माहितगार मंडळींनी याबाबत प्रतिक्रिया द्याव्यात) पण हीची चव म्हणजे एकदम काफर. टेस्टी, मऊ, लुसलुशीत अशी ही काकडी एकदा खाल्ली की बाजारात मिळणाऱ्या खिरे काकडीला आपण नक्कीच शिव्या घालणार. इतकी ही काकडी आपलीशी होऊन जाते.. कोल्हापूर ते सिंधुदुर्ग जाताना रस्त्यात अनेक ठिकाणी अशा काकडी विकणाऱ्यांची भेट होईल. सकाळी अन् संध्याकाळी ही स्थानिक शेतकरी मंडळी भेटतात. इतर ठिकाणी कुठेही अशी काकडी मिळत असल्यास कळवा. म्हणजे त्या भागात गेल्यावर आम्हा पामारांना ती खाता येईल की..
Lifestyle News: पाणी आणि सौंदर्याचा ‘असा’ आहे संबंध; पहा काय म्हणतेय श्वेता तिवारी https://t.co/UmHLOkTbr6
Advertisement— Krushirang (@krushirang) May 12, 2022
Advertisement