बाब्बो.. या राज्यात सुरू आहे उष्णतेचे थैमान.. पहिल्यांदाच तापमानाने केलेय मोठे रेकॉर्ड; जाणून घ्या..
दिल्ली – आज सोमवार आणि मंगळवारी कडक उष्णतेपासून थोडासा दिलासा मिळेल. राष्ट्रीय राजधानी अंशतः ढगाळ राहील, धुळीच्या वादळाचीही शक्यता आहे. राजधानीत कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 41 आणि 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. यानंतर बुधवार आणि गुरूवारी आकाश निरभ्र असेल, मात्र राजधानीतील लोकांना कडक उन्हाचा (Heavy Heat) सामना करावा लागणार आहे.
हवामान खात्याने (Weather Department) शुक्रवारसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. या मोसमात रविवार हा दिल्लीसाठी सर्वात उष्ण दिवस ठरला. मंगेशपूर आणि नजफगडमध्ये पारा 49 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. दिल्लीत आजपर्यंत इतक्या तापमानाची (Temperature) नोंद झालेली नाही. हवामान खात्यानुसार सोमवार आणि मंगळवारी उष्णतेपासून दिलासा मिळू शकतो. दिल्ली एनसीआरमध्ये आज ढगाळ वातावरण असेल. धुळीचे वादळ असू शकते. त्यामुळे तापमान 41 अंशांपर्यंत कमी होण्याची शक्यता आहे. मात्र 18 मे नंतर पुन्हा एकदा उष्णतेचा प्रभाव वाढणार आहे.
या राज्यांमध्ये गडगडाटासह हलका पाऊस (Rain) पडण्याची शक्यता आहे
पंजाब, हरियाणा आणि उत्तर भारताच्या काही भागात हलका पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो. बहुतांश भागात धुळीचे वादळ येण्याची शक्यता आहे. राजधानी दिल्ली आणि पश्चिम उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) धुळीचे वादळ येणार आहे. राजस्थान, मध्य प्रदेश, दक्षिण उत्तर प्रदेश, हरियाणा आणि दिल्लीमध्ये उष्णता कायम राहणार आहे. विदर्भ, उत्तर मध्य महाराष्ट्र आणि गुजरातमध्येही उष्णतेची लाट कायम राहील.
हवामान खात्यानुसार, वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे राजधानीत ढग दिसतील. यामुळे धुळीचे वारेही वाहू शकतात. तापमान 41 अंशांपर्यंत खाली येऊ शकते, परंतु किमान तापमान 28 अंशांपर्यंत वाढू शकते. पण हा दिलासा फार काळ टिकणार नाही. 18 मेपासून पुन्हा एकदा तापमान वाढण्यास सुरूवात होईल आणि 19 आणि 20 मेच्या सुमारास ते 44 ते 45 अंशांपर्यंत पोहोचेल. यानंतर वेस्टर्न डिस्टर्बन्सचा प्रभाव 21 मे पासून पुन्हा एकदा दिसून येईल आणि तापमान 41 अंशांपर्यंत कमी होऊ शकते.
हिमाचल प्रदेशातील लोकांना उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारपासून राज्यात वादळी वारे आणि गारपीट होऊ शकते. अनेक जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. काही ठिकाणी पाऊसही पडू शकतो. रविवारीही हवामानात बदल होण्याची शक्यता होती मात्र त्याचा परिणाम झाला नाही. रविवारी राज्यात हंगामातील सर्वात उष्ण दिवसाची नोंद झाली.
पंजाबमध्ये धुळीचे वादळ आणि गडगडाट होण्याची शक्यता आहे.
हवामान खात्यानुसार, सिक्कीम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि लक्षद्वीपमध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पाऊस पडू शकतो. याशिवाय ईशान्य बिहार, छत्तीसगड आणि कर्नाटकच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे. ओडिशा, दक्षिण मध्य महाराष्ट्र, तेलंगणा आणि पश्चिम हिमालयीन भागातही हलका पाऊस पडू शकतो.
चक्रीवादळाचा इफेक्ट..! हवामान खात्याने ‘या’ राज्यांना दिलाय मोठा अलर्ट; पहा, काय घडणार..