Take a fresh look at your lifestyle.

चक्रीवादळाचा इफेक्ट..! हवामान खात्याने ‘या’ राज्यांना दिलाय मोठा अलर्ट; पहा, काय घडणार..

दिल्ली – आसानी चक्रीवादळ (Asani Cyclone) आंध्र प्रदेशच्या दिशेने सरकत असताना हवामान खात्याने वादळ, अनेक भागात मुसळधार पाऊस, वादळ आणि जोरदार वारे आणि स्थानिक भागात पूरस्थिती लक्षात घेऊन राज्याच्या किनारी भागासाठी रेड अलर्ट (Red Alert) जारी केला आहे. IMD नुसार, आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम, विझियानगरम, विशाखापट्टणम, पूर्व गोदावरी, कृष्णा, गुंटूर आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यांमध्ये 40-50 किमी प्रतितास वेगाने वाऱ्यासह जोरदार पाऊस पडत आहे.

Advertisement

बुधवारी सकाळपर्यंत हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील (Andhra Pradesh) काकीनाडा आणि विशाखापट्टणम दरम्यानच्या किनारी भागात धडकू शकते, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले. त्यानंतर ते पश्चिम-मध्य बंगालच्या (West Bengal) उपसागरात पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे आंध्र प्रदेशात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. या वादळाचा प्रभाव बिहार, झारखंड, छत्तीसगडमध्येही राहील. 11 ते 13 मे या कालावधीत येथे पाऊस पडेल, तसेच जोरदार वारे वाहतील. बुधवारी सकाळपर्यंत ते जवळजवळ वायव्येकडे सरकण्याची आणि पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरात काकीनाडा-विशाखापट्टणम किनारपट्टीजवळ पोहोचण्याची दाट शक्यता आहे, असे IMD ने म्हटले आहे.

Advertisement

त्यानंतर ते हळूहळू उत्तर-ईशान्य दिशेला वळेल आणि काकीनाडा आणि विशाखापट्टणम दरम्यान किनार्‍याजवळ सरकण्याची आणि नंतर उत्तर आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनार्‍यावरून उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात येण्याची शक्यता आहे. ते हळूहळू कमकुवत होऊन चक्रीवादळ बनण्याची शक्यता आहे. बुधवारी सकाळपर्यंत आणि 12 मे च्या सकाळपर्यंत चक्रीवादळ आणखी कमकुवत होईल. आसनी चक्रीवादळ समुद्रातच (Sea) कमकुवत होऊनही समुद्र पूर्णपणे खवळला आहे. आकाश काळ्याकुट्ट ढगांनी व्यापले आहे. ओडिशात (Odisha) भुवनेश्वरसह किनारी जिल्ह्यांमध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पर्यटकांना समुद्रात जाण्यास बंदी आहे.

Advertisement

‘गुलाब’नंतर महाराष्ट्रावर आणखी एका चक्रीवादळाचा धोका, कोणत्या जिल्ह्यांना इशारा दिलाय, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply