बाजरी (Bajara Farming) पिकाच्या श्रद्धा (shraddha), सबुरी (Saburi), शांती (shanty), आदीशक्ती (Aadi shakti) या संकरीत जातीच्या महाराष्ट्रात लागवड करण्यासाठी शिफारस करण्यात आली आहे. आय. सी. टी. पी. – ८२०३, आय.सी.एम.व्ही.- २२१,समृद्धी, धनशक्ती व परभणी संपदा या बाजरी (Bajari / Bajri) पिकाच्या सुधारित जाती आहेत. (Bajara farming and cultivation tips in Marathi for Maharashtra farmer)
भुईमुगाची लागवड करताय? जाणून घ्या, जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाण्याचे प्रमाण याविषयी सविस्तर माहिती https://t.co/iocCdR9kxN
Advertisement— Krushirang (@krushirang) May 11, 2022
Advertisement
संकरित जाती तयार करण्यासाठी दोन भिन्न जातींचा संकर करून मादी वाणावर तयार झालेल्या बियाण्यास संकरित वाण/जात म्हणतात.अशा संकरित वाणामध्ये जास्त उत्पादन देण्याची क्षमता असते. तसेच पीक एकसारखे दिसते. सुधारित वाण चांगले गुणधर्म धारण केलेल्या झाडांची निवड करून त्यांना विलगीकरण अंतरात परागीभवन करून तयार केले जातात. असे वाणांचे पीक एकसारखे दिसत नाही. या सुधारित वाणांचे बियाणे दोन – तीन वर्षापर्यंत वापरता येते. मात्र संकरित वाणांचे बियाणे दरवर्षी नविन घ्यावे लागते. कारण त्या बियाण्यातील संकरित जोम हा फक्त पहिल्या पिढीपुरताच मर्यादित असतो. त्यामुळे दरवर्षी संकरित वाणांचे बियाणे नवीन विकत घ्यावे.
भुईमुगाचे उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञान येईल कामी; हे 6 मुद्दे घ्या लक्षात https://t.co/8dK4ccwrl6
Advertisement— Krushirang (@krushirang) May 11, 2022
Advertisement