Take a fresh look at your lifestyle.

भुईमुगाची लागवड करताय? जाणून घ्या, जमिनीची निवड, पूर्वमशागत, बियाण्याचे प्रमाण याविषयी सविस्तर माहिती

कुठल्याही हंगामात भुईमुगाची लागवड करताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. जसे की, जमिनीची निवड, पूर्वमशागत, वाणांची निवड, वातावरण आणि बियाण्याचे प्रमाण. आता आपण एकेक गोष्ट मुद्देसूद जाणून घेवूयात. (bhuimug lagavad ground nut cultivation and farming in Maharashtra mulching tips in Marathi)

Advertisement

Advertisement

अशी करावी जमिनीची निवड :- भुईमुगाच्या लागवडीसाठी ४५ से.मी. ते १ मीटर खोल, मध्यम, चांगल्या निचरयाची. चुना व सेंद्रीय पदार्थ योग्य प्रमाणात असलेली, मऊ व भुसभुशीत जमिन योग्य असते. भारी, चिकणमातीयुक्त जमिन भुईमुगासाठी अयोग्य असते.

Advertisement

पूर्वमशागत करताना :- भुईमुगासाठी जमिन भुसभुशीत असणे गरजेचे असते. त्यासाठी जमिनीची मध्यम ते खोल नांगरट करावी व १५ ते २० दिवसांच्या अंतराने २ ते ३ कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीपूर्वी शेतात चांगले कुजलेले शेणखत १० टन प्रति हेक्टर समप्रमाणात पसरून द्यावे.

Advertisement

Advertisement

बियाण्याचे प्रमाण (seed quantity) :- पेरणीसाठी प्रमाणीकरण यंत्रणेने निवड केलेल्या शिफारशीत वाणांची पेरणी करणे गरजेचे असते, पेरणीपूर्वी ८ ते १० दिवस अगोदर शेंगा फोडून बियाणे तयार करावे. फुटके, किडके, साल निघालेले, बारीक बी निवडून राहिलेले मध्यम, टपोरे बियाणे पेरणीसाठी वापरावे. सर्वसाधारणपणे लहान ते मध्यम आकाराचे शेंगदाणे पेरणीसाठी प्रति हेक्टरी १०० किलो बियाणे वापरावे. (उदा.फुले-६०२१, जे.एल. -२४, जे.एल.-२८६, एस.बी.-११, टी.ए.जी. -२४ किंवा टी.जी. -२६) व मोठ्या आकाराचे शेंगदाणे पेरणीसाठी १२५ ते १५० किलो बियाणे वापरावे. (उदा. टी.पी.जी.-४१, टी. के जी. -१९ ए).

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply