Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भुईमुगाचे उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञान येईल कामी; हे 6 मुद्दे घ्या लक्षात

Please wait..

भुईमुगाची लागवड खरीप (Kharip), रब्बी (Rabbi) व उन्हाळी (Unhali) या तीनही हंगामात केली जाते. पंरतु प्रामुख्याने महाराष्ट्रात खरीप व उन्हाळी या दोन हंगामात भुईमुगाची लागवड केली जाते. भुईमुगासाठी जमिन भुसभुशीत असणे गरजेचे असते. त्यासाठी जमिनीची मध्यम ते खोल नांगरट करावी व 15 ते 20 दिवसांच्या अंतराने 2 ते 3 कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. शेवटच्या कुळवणीपूर्वी शेतात चांगले कुजलेले शेणखत 10 टन प्रति हेक्टर समप्रमाणात पसरून द्यावे. (bhuimug lagavad ground nut farming in Maharashtra mulching)

Advertisement

Advertisement
Loading...

भारतात दरवर्षी खाद्यतेलाच्या (Food Oil) एकूण गरजेच्या 50 टक्के गरज आयात केलेल्या तेलापासून (Import of oil seed) भागविली जाते. तेलबियांच्या उत्पादनात आपला देश स्वयंपूर्ण व्हावा यादृष्टीने भुईमूगाची लागवड सुधारित पध्दतीने होणे गरजेचे आहे. भुईमुगाचे उत्पादन वाढीसाठी सुधारित तंत्रज्ञानाच्या ठळक बाबी पुढील प्रमाणे आहेत.

Advertisement
  1. सुधारित वाणांची लागवडीसाठी निवड करणे
  2. बियाण्याचा योग्य प्रमाणात वापर करणे
  3. लागवडीच्या सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करणे
  4. बीजप्रक्रिया, खतांचा संतुलित वापर व गरजेनुसार सुक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे
  5. जिवाणू संवर्धकांचा वापर करणे
  6. पाणी व्यवस्थापन व किड /रोग नियंत्रण वेळेत करणे

Advertisement
Advertisement

Leave a Reply