Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : कोलकाताने केला मोठा उलटफेर.. बाकीच्या संघांचे वाढले टेन्शन; जाणून घ्या..

मुंबई – कोलकाता नाईट रायडर्स (KKR) ने IPL 2022 च्या 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) चा 52 धावांनी पराभव करून त्यांच्या प्ले ऑफच्या (Play Off) आशा जिवंत ठेवल्या. प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 165 धावा केल्या आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सचा डाव 17.3 षटकांत 113 धावांवर आटोपला. 12 सामन्यांमधला कोलकाताचा हा पाचवा विजय होता आणि आता ते IPL 2022 पॉइंट टेबल अपडेटमध्ये नवव्या क्रमांकावरून सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. कोलकात्याच्या विजयाचा त्यांना फायदा झाला आहे, तर पंजाब किंग्जला एक क्रमांक गमवावा लागला असून, चेन्नई सुपर किंग्जची (Chennai Super Kings) आठव्या क्रमांकावरून नवव्या क्रमांकावर घसरण झाली आहे.

Advertisement

मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यानंतर, लखनौ सुपर जायंट्स 8 विजय आणि 3 पराभवांसह 11 सामन्यांतून 16 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे. LSG चा निव्वळ रन रेट +0.703 आहे. त्याच वेळी, गुजरात टायटन्स (Gujarat Titans) देखील 11 सामन्यांतून 8 विजय आणि तीन पराभवांसह 16 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात आज सामना होणार आहे. दोन्ही संघांचे उद्दीष्ट प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यावर असेल. यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी आठ संघांमध्ये लढत सुरू राहणार आहे. IPL 2022 च्या प्लेऑफच्या शर्यतीतून फक्त मुंबई इंडियन्स बाहेर पडला आहे.

Loading...
Advertisement

याशिवाय संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) तिसऱ्या क्रमांकावर आणि रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरू चौथ्या क्रमांकावर कायम आहे. त्याचवेळी दिल्ली कॅपिटल्स पाचव्या, सनरायझर्स हैदराबाद सहाव्या आणि कोलकाता नाइट रायडर्स सातव्या क्रमांकावर पोहोचले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्स 11 सामन्यांत केवळ दोन विजय मिळवून तळाच्या दहाव्या क्रमांकावर आहे.

Advertisement

राजस्थानच्या अडचणीत वाढ; ‘तो’ स्टार खेळाडू IPL अर्धवट सोडून आपल्या देशात परतला

Advertisement
Advertisement

Leave a Reply