Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Gold Price Today : आज सोन्या-चांदीचे मीटर डाऊन.. पहा, काय आहेत नवीन दर..

दिल्ली – शुक्रवारी देशातील सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold silver Price) थोडीशी घसरण नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोन्याचे दर कमी होऊन 51,227 रुपयांवर पोहोचले, तर एक किलो चांदीचा दरही कमी झाला आहे. आता ते 62,393 रुपयांना विक्री होत आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजने (HDFC Securities) ही माहिती दिली आहे.

Advertisement

दिल्ली सराफा बाजारात सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 43 रुपयांनी कमी होऊन 51,227 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 51,270 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाले होते. दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 62 रुपयांनी कमी होऊन 62,393 रुपये प्रति किलोवर बंद झाला. गेल्या व्यापार सत्रात दिल्ली सराफा बाजारात चांदीचा भाव 62,455 रुपये प्रति किलोवर बंद झाला होता.

Advertisement

हे लक्षात घेण्यासारखे आहे, की 2021-22 मध्ये हिरे आणि दागिन्यांची निर्यात (Jewellery Export) वाढली आहे आणि मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत सुमारे 55 टक्क्यांनी वाढून $ 39.15 अब्ज झाली आहे. जेम्स अँड ज्वेलरी एक्सपोर्ट प्रमोशन कौन्सिल (GJEPC) ने सांगितले की, 2020-21 मध्ये हिरे आणि दागिन्यांची एकूण निर्यात $25.40 अब्ज होती. गेल्या आर्थिक वर्ष 2021-22 मध्ये देशातील सोन्याची आयात (Gold Import) 33.34 टक्क्यांनी वाढून 46.14 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, 2020-21 या आर्थिक वर्षात देशाची सोन्याची आयात $34.62 अब्ज होती.

Loading...
Advertisement

तसे पाहिले तर देशात सोन्याला कायमच मागणी असते. चांगला मुहूर्त किंवा सण उत्सवाच्या वेळी सोने खरेदी केली जाते. तसेच पैशांची सुरक्षित गुंतवणूक (Money Investment) म्हणूनही सोने खरेदीला लोक प्राधान्य देतात. त्यामुळे आपल्याकडे सोन्याला नेहमीच मागणी असते. कोरोना काळातही देशभरात सोन्याला मागणी वाढली होती.

Advertisement

फक्त 5 दिवसांत सोन्या-चांदीच्या दरात मोठी कपात.. सोने खरेदीआधी जाणून घ्या नवे दर..

Advertisement
Advertisement

Leave a Reply