Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

.. म्हणून पाकिस्तान-श्रीलंका यांच्यातील एकदिवसीय मालिका रद्द; जाणून घ्या, काय आहे कारण

दिल्ली – श्रीलंकेत सध्या अत्यंत वाईट परिस्थिती निर्माण झाली आहे. या देशातील आर्थिक संकट प्रचंड वाढले आहे. आंदोलने तर रोजचीच आहेत. याचा फटका सर्वच क्षेत्रांना बसत आहे. आता पाकिस्तान आणि श्रीलंका या दोन्ही क्रिकेट मंडळांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. जुलैमध्ये पाकिस्तान क्रिकेट संघ (Pakistan Cricket Board) श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यावर आता उभय संघांमध्ये फक्त दोन सामन्यांची कसोटी मालिका होणार आहे. या दौऱ्यावर याआधी कसोटी मालिकेव्यतिरिक्त एकदिवसीय मालिका होणार होती, परंतु श्रीलंका क्रिकेटच्या (Sri lanka Cricket) विनंतीमुळे ही एकदिवसीय मालिका तूर्तास रद्द करण्यात आली आहे. कसोटी मालिकेच्या (Test Series) तारखाही अद्याप जाहीर झालेल्या नाहीत.

Advertisement

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) फ्युचर टूर प्लान (Future Tour Plan) नुसार या मालिकेत पहिली तीन सामन्यांची एकदिवसीय मालिकाही होणार होती. ही एकदिवसीय मालिका वर्ल्ड सुपर लीगमध्ये समाविष्ट करण्यात आली नसली तरी दोन्ही देशांच्या बोर्डांनी ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सिल्वा यांनी क्रिकइन्फोला (Cricinfo) ही माहिती दिली.

Loading...
Advertisement

या मालिकेआधी श्रीलंका जूनमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात मालिका खेळणार आहे, तर पाकिस्तानविरुद्धच्या मालिकेनंतर श्रीलंकेच्या खेळाडूंना ऑगस्टमध्ये लंका प्रीमियर लीगमध्ये भाग घ्यायचा आहे. आशिया चषक (Asia Trophy) सप्टेंबरमध्ये प्रस्तावित आहे आणि त्यानंतर ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 विश्वचषक (T 20 World Cup) होणार आहे, त्यामुळे खेळाडूंना क्रिकेटच्या अति थकव्यापासून संरक्षित करण्यासाठी बोर्डाने हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले. याआधी दोन्ही संघ 2019 मध्ये कसोटी मालिकेत आमनेसामने आले होते. 2009 ला लाहोर हमल्यानंतर कोणत्याही आंतरराष्ट्रीय संघाचा हा पहिलाच पाकिस्तान दौरा होता, जो पाकिस्तानने 1-0 ने जिंकला होता.

Advertisement

बाब्बो.. तरीही ‘तिथे’ पोहोचलाय कोरोना; पाकिस्तान क्रिकेटचे टेन्शन वाढले; पहा, नेमके काय घडलेय..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply