Take a fresh look at your lifestyle.

आयपीएलमुळे BCCI होणार आणखी मालामाल.. पहा, कशा पद्धतीने मिळणार उत्पन्न

मुंबई – आयपीएल मीडिया हक्कांसाठी (Media Rights) अनेक बड्या कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे. देशातील Viacom18, Zee Entertainment, Star, Sony यांसारख्या दिग्गज कंपन्यांव्यतिरिक्त, यावेळी यूके आणि दक्षिण आफ्रिकेतील कंपन्यांनीही स्वारस्य दाखवले आहे. यूकेच्या स्काय स्पोर्ट्स (Sky Sports) आणि दक्षिण आफ्रिकेच्या सुपरस्पोर्ट (Supersport) सारख्या आंतरराष्ट्रीय प्रसारकांनी बोलीसाठी आवश्यक कागदपत्रे खरेदी केली आहेत.

Advertisement

बीसीसीआयला (BCCI) मीडिया हक्कांमधून पाच हजार कोटींहून अधिक कमाई अपेक्षित आहे. मीडिया हक्क पुढील 5 वर्षांसाठी (2023-2027) विकले जातील. बिडिंगसाठी कागदपत्रे खरेदीवरुन असे स्पष्ट होत नाही, की स्काय स्पोर्ट्स आणि सुपरस्पोर्ट आवश्यकपणे बोली लावतील. यावेळी बीसीसीआयने मीडिया हक्क चार वेगवेगळ्या पॅकेजमध्ये विभागले आहेत. गेल्या वेळेप्रमाणे या वेळीही एकाच वेळी सर्वांसाठी बोली लागणार नाही. अशा स्थितीत टीव्ही हक्कांसाठी स्काय स्पोर्ट्स आणि सुपरस्पोर्ट यांच्यात स्पर्धा होऊ शकते.

Advertisement

यावेळी आयपीएल मीडिया हक्कांसाठी चार पॅकेजेस आहेत. यामध्ये टीव्ही हक्क, डिजिटल अधिकार, 18 सामन्यांचे अधिकार आणि उर्वरित जगाचे अधिकार यांचा समावेश आहे. बोलीची मूळ किंमत 32890 कोटी रुपये आहे. बोली कागदपत्रे खरेदी करण्याची अंतिम तारीख 10 मे आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामाच्या समाप्तीनंतर मीडिया अधिकारांचा ई-लिलाव केला जाईल.

Advertisement

सध्याचे मीडिया अधिकार स्टारकडे आहेत, जे 2017 मध्ये सुरू झाले होते आणि या हंगामात संपत आहे. संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवली जाईल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सांगितले होते. यातून मिळणारे उत्पन्न देशांतर्गत क्रिकेटला मजबूत करण्यासाठी वापरले जाणार आहे. निविदा कागदपत्रे खरेदी करण्यासाठी इच्छुक पक्षांना सुमारे 25 लाख रुपये बोर्डाकडे जमा करावे लागतील.

Advertisement

आयपीएल 2022 च्या पहिल्याच सामन्यात या संघाने मारली बाजी.. कोणाला दिला झटका

Advertisement
Advertisement

Leave a Reply