Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

IPL 2022 : त्यामुळे आम्ही महत्वाचा सामना गमावला.. धोनीने सांगितले पराभवाचे खरे कारण..

मुंबई – महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्जचा बुधवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने जोरदार पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना बंगळुरूने चेन्नईसमोर 174 धावांचे लक्ष्य ठेवले होते, या धावसंख्येसमोर चेन्नईला 20 ओव्हरमध्ये केवळ 160 रन्स करता आले. बंगळुरूने हा सामना 13 धावांच्या फरकाने जिंकला. या पराभवाचे खापर धोनीने फलंदाजांवर फोडले. धोनी म्हणाला की, चांगल्या सुरुवातीनंतर त्याच्या संघाने खराब शॉर्ट्समुळे विकेट गमावल्या.

Advertisement

सामन्यानंतर धोनी म्हणाला,की “आम्ही त्यांना 170 धावांच्या आसपास रोखले. मला वाटले की दुसऱ्या सहामाहीत विकेट आणखी चांगली होईल. आम्ही फलंदाजीतही चांगली सुरुवात केली. ते फक्त योजनेनुसारच होते. पण आमच्या फलंदाजांनी आम्हाला निराश केले. तुम्ही पाठलाग करत असताना तुम्हाला किती धावांची गरज आहे हे कळते आणि त्या वेळी तुम्ही सामन्याच्या परिस्थितीनुसार खेळता.

Loading...
Advertisement

आम्ही चांगली सुरुवात केली आणि आमच्याकडे विकेट्स होत्या, सामन्यात विकेट चांगली होत होती पण आम्ही वारंवार अंतराने विकेट गमावल्या. पाठलाग करताना लक्ष्य हे संपूर्ण गणनेवर अवलंबून असते. सलग सातव्या पराभवानंतर गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज प्लेऑफच्या शर्यतीतून बाद होण्याच्या मार्गावर आहे. संघाचा निव्वळ रनरेटही अत्यंत खराब आहे आणि जर सीएसकेने उर्वरित चार सामने जिंकले तर ते केवळ 14 गुणांपर्यंत पोहोचतील. त्यामुळे यावेळी चेन्नई आयपीएल विजेता होऊ शकणार नाही, हेच यावरुन स्पष्ट होत आहे. मागील आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करत चेन्नईने आयपीएल विजेतेपद पटकावले होते. यावेळी मात्र गतविजेत्या संघाची कामगिरी सुरुवातीपासूनच खराब राहिली आहे. मुंबईप्रमाणेच चेन्नईने सुद्धा सुरुवातीचे अनेक सामने गमावले आहेत.

Advertisement

IPL 2022: म्हणून CSK ची जबाबदारी पुन्हा धोनीवरच..! पहा काय निर्णय घेतला आहे टीमने

Advertisement
Advertisement

Leave a Reply