Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात कुठे दिसणार? काय काळजी घ्याल.?

मुंबई : यंदाच्या वर्षातील पहिले सूर्यग्रहण आज (30 एप्रिल) होत आहे. ज्याचा परिणाम भारतात होणार नाही. आपण हे ग्रहण पाहू शकणार नाही. हे सूर्यग्रहण आंशिक असेल, त्यामुळे सुतक कालावधी नसेल.

Advertisement

भारतीय प्रमाणवेळेनुसार, शनिवारी अमावस्येच्या रात्री 12:16 पासून सूर्यग्रहण सुरू होईल. ते 1 मे रोजी पहाटे 4 वाजेपर्यंत राहील. हे ग्रहण दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली, नेरू, उरुग्वे, पॅराग्वे, उत्तर अंटार्क्टिका, दक्षिण पॅसिफिक समुद्र आणि दक्षिण अटलांटिक समुद्र येथे दिसणार आहे.. भारतात रात्र असल्याने ग्रहण दिसणार नाही. त्यामुळे भारतात कोणतेही धार्मिक विधी करण्याची गरज नाही.. सूर्यग्रहण अर्धवट असल्याने केवळ 64 टक्के सूर्य चंद्राच्या सावलीने झाकलेला असेल.

Advertisement

आंशिक सूर्यग्रहण म्हणजे काय?
सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये जेव्हा चंद्र येतो, तेव्हा पृथ्वीवर सावली पडते.. त्या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. परंतु जेव्हा चंद्र अर्धवट सूर्यप्रकाश झाकतो, म्हणजेच जेव्हा सूर्य चंद्रकोराच्या रूपात दिसतो, तेव्हा ‘आंशिक सूर्यग्रहण’ होते. जेव्हा चंद्र त्याच्या सावलीचा फक्त बाह्य भाग सूर्यावर टाकतो, तेव्हा त्याला उपछाया म्हणतात.

Loading...
Advertisement

सूर्यग्रहण कुठे दिसणार?

Advertisement
  • 30 एप्रिल रोजी होणारे सूर्यग्रहण भारतात कुठेही दिसणार नाही. हे सूर्यग्रहण फक्त अंटार्क्टिका, अटलांटिक, पॅसिफिक महासागर, दक्षिण अमेरिका आणि पश्चिम दक्षिण अमेरिकेत दिसणार आहे.
  • सूर्यग्रहणाच्या वेळी या 10 गोष्टी लक्षात ठेवा
  • सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहू नये.
  • सुतक काळात अन्न शिजवू नये किंवा खाऊ नये.
  • सूर्यग्रहण असो की चंद्रग्रहण, यावेळी मंदिरांचे दरवाजे बंद ठेवले जातात.
  • ग्रहण काळात देवाचे ध्यान केले जाते.
  • ग्रहण काळात मंदिरे उघडली जात नाहीत, त्यामुळे घरात ठेवलेल्या देवाच्या मूर्तींना हात लावू नका.
  • जर घरामध्ये मंदिर असेल तर ते ग्रहण काळात झाकले पाहिजे.

‘एमपीएससी’चा निकाल जाहीर, टेम्पोचालकाचा मुलगा राज्यात प्रथम…!
सरकारी कंपनीची जबरदस्त ऑफर..! मिळतोय तब्बल 120 GB डेटा अगदी मोफत; चेक करा, डिटेल..

Advertisement
Advertisement

Leave a Reply