Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

‘एमपीएससी’चा निकाल जाहीर, टेम्पोचालकाचा मुलगा राज्यात प्रथम…!

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा-2020 चा अंतिम निकाल शुक्रवारी (ता. 29) जाहीर झाला. त्यात सांगलीच्या प्रमोद चौगुले याने राज्यात प्रथम क्रमांक मिळवला, तर रुपाली माने हिने महिलांमधून प्रथम क्रमांक प्राप्त केला. आता ऑप्टिंग आऊटच्या प्रक्रियेनंतर शिफारसपात्र उमेदवारांची अंतिम यादी जाहीर करण्यात येईल. विशेष म्हणजे, मुलाखती संपल्यानंतर लगेच निकाल जाहीर करण्यात आला.

Advertisement

‘एमपीएससी’तर्फे डिसेंबर-2019 मध्ये 15 संवर्गातील 200 पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. एप्रिल-2020 मध्ये परीक्षा घेण्याचे आयोगाचे नियोजन होते. मात्र, कोरोनामुळे ही परीक्षा चार वेळा पुढे ढकलावी लागली. अखेर मार्च-2021 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा झाली. त्यासाठी सुमारे 2 लाख 62 हजार 891 उमेदवारांनी नोंदणी केली, तर 1 लाख 71 हजार 116 उमेदवारांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. पूर्व परीक्षेचा निकाल सप्टेंबर-2021 मध्ये जाहीर झाला. त्यात 3 हजार 214 उमेदवारांची मुख्य परीक्षेसाठी निवड झाली.. पैकी 2 हजार 863 उमेदवारांनी डिसेंबर-2021 मध्ये मुख्य परीक्षा दिली. त्यातून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या 615 पैकी 597 उमेदवारांनी मुलाखत दिली. त्यानंतर 18 ते 29 एप्रिल दरम्यान मुलाखती घेऊन अंतिम निकालाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली.

Advertisement

मुलाखती झाल्यानंतर अवघ्या काही तासांत आयोगाने अंतिम निकाल जाहीर केला. त्यात प्रमोद चौगुले याने प्रथम, नितेश कदम याने द्वितीय, रुपाली माने हिने तृतीय, तर शुभम जाधव आणि अजिंक्य जाधव यांनी अनुक्रमे चौथा व पाचवा क्रमांक पटकावला आहे. रुपाली माने हिने मुलींमध्ये पहिला क्रमांक मिळवला.. खरं तर कोरोनामुळे या परीक्षेला मोठा विलंंब झाला. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण होते. परंतु, डिसेंबरमध्ये मुख्य परीक्षा झाल्यावर एप्रिलमध्ये मुलाखती झाल्या. मुलाखतीनंतर तीन-चार महिन्यांनी निकाल जाहीर होतो. मात्र, आयोगाने काही तासांतच निकाल जाहीर केल्याने उमेदवारांनी आश्चर्य व्यक्त केलं.

Loading...
Advertisement

याबाबत प्रमोद चौगुले म्हणाला, की गेल्या राज्यसेवा परीक्षेत एका गुणाने संधी हुकली होती. त्यामुळे पुन्हा जोमाने अभ्यास केल्याने हे यश मिळाले.. ‘युपीएससी’ बरोबरच मी ‘एमपीएससी’ची तयारी करीत होतो. माझे वडील टेम्पो चालक असून, आई गृहिणी आहे.

Advertisement

सरकारी कंपनीची जबरदस्त ऑफर..! मिळतोय तब्बल 120 GB डेटा अगदी मोफत; चेक करा, डिटेल..
Airtel ने दिलीय मोठी खुशखबर.. आता ‘या’ पोस्टपेड प्लानबरोबर मिळणार ‘हे’ फायदे; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply