Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

महिलांना मिळणार 6 हजार रुपये, मोदी सरकारच्या ‘या’ खास योजनेबाबत जाणून घ्या..

मुंबई : देशातील विविध समाज घटकांसाठी मोदी सरकार वेगवेगळ्या योजना राबवित असते.. महिलांसाठीही सरकार अनेक योजना आणल्या असून, खास करुन गरजू, गरीब महिलांना त्याचा मोठा फायदा होत आहे. महिलांचे जीवनमान सुधारण्यासाठी मोदी सरकारने आणलेली अशीच एक योजना सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. मोदी सरकारची ही योजना फक्त महिलांसाठीच असून, या योजनेद्वारे महिलांना चक्क 6 हजार रुपयांची मदत केली जात आहे.. या योजनेचं नाव आहे, प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजना..

Advertisement

मोदी सरकारने खास गर्भवती महिलांसाठी ही योजना सुरू केलीय. या योजनेचा लाभ घेण्यासाठी फक्त गर्भवती महिलाच अर्ज करू शकतात. गर्भवती महिलांचे जीवनमान उंचावण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेतून गर्भवती महिलांना 6 हजार रुपयांची मदत केली जाते..

Advertisement

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

Loading...
Advertisement

प्रधानमंत्री मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांना काही आवश्यक कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतात. त्यामध्ये आई-वडिलांचे आधार कार्ड, पालकांचे ओळखपत्र, मुलाचे जन्म प्रमाणपत्र, तसेच बॅंक खात्याचे पासबुक आदींचा समावेश आहे.

Advertisement

दरम्यान, या योजनेअंतर्गत गर्भवती महिलांना 6 हजार रुपये मिळत असले, तरी हे पैसे एकदम सगळे दिले जात नाही. तर तीन हप्त्यांमध्ये गर्भवती महिलांच्या बॅंक खात्यावर हे पैसे वर्ग केले जातात.  त्यात पहिल्या टप्प्यात 1000 रुपये, दुसर्‍या टप्प्यात 2000 रुपये, तर तिसर्‍या टप्प्यात 2000 रुपये दिले जातात. तसेच, बाळाच्या जन्माच्या वेळी सरकार शेवटचे 1000 रुपये हे रुग्णालयाला देते.. त्यातून गर्भवती महिलेचा औषधोपचाराचा खर्च दिला जातो..

Advertisement

वाव.. आजच देशात येतोय ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन.. जाणून घ्या, काय आहेत खास फिचर..
Recipe : नाश्त्यासाठी अशा पद्धतीने तयार करा पनीर टिक्का रोल.. आहे टेस्टी अन् हेल्दी..

Advertisement
Advertisement

Leave a Reply