मुंबई : सध्या राज्यात पुन्हा एकदा कांद्याचा वांदा झाला आहे.. कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी मोठ्या अडचणीत आला आहे. अस्मानी संकटांचा सामना करीत शेतकऱ्यांनी कांद्याचे पीक चांगले आणले खरे, पण सुल्तानी संकटासमोर शेतकऱ्याचा नाईलाज झाला आहे. बाजारात कांद्याला चांगला दर मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहे. सध्या कांद्याला बाजारात प्रति क्विंटलला 200 ते 300 रुपयांचा दर मिळत आहे. दर घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे.
कांदा उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी लाखो रुपये खर्च केले. मात्र, शेतातील कांदा बाजारात नेला असता, कांद्याला फक्त 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा कांदा उत्पादनाचा खर्चही निघणं कठीण झालंय.. मेहनत तर वेगळीच. कांद्याला भाव नसल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलंय. सध्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात कांदा पडून आहे. सध्या वातावरणातही बदल होत आहे. कधी ऊन, तर कधी पाऊस.. त्यामुळे शेतातील कांदा खराब होण्याच्या बेतात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात धास्ती वाढली आहे. कांदा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
सध्या मातीमाेल भावाने कांदा विकला जात आहे.. सुरुवातीला कांद्याला 2 हजार रुपयांपर्यंत होता. पण नंतर बाजारात मोठ्या प्रमाणात कांदा आल्याने भाव कोसळले.. त्यासाठी सरकारच जबाबदार असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. फक्त ‘जय जवान जय किसान’चा नारा देऊन चालणार नाही. स्वामिनाथन आयोग लागू करावा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना उत्पादन खर्चापेक्षा दुप्पट भाव मिळणार असल्याची घोषणा केली होती, परंतू त्याचे पुढे काहीच होताना दिसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना ‘अच्छे दिन’ कधी येणार, असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला..
म्हणून UPL कंपनीने ‘त्या’ गावाला दिला ५० टन झेबा; पहा नेमका काय होतोय याचा शेतीमध्ये उपयोग
कडाक्याच्या उन्हाळ्याने सरकारलाही फोडलाय घाम..’तिथे’ विजेच्या वापराने मोडलेत सगळेच रेकॉर्ड..