Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीकर हैराण..! सरकारकडे पाडलाय तक्रारींचा पाऊस; पहा, दिल्ली सरकारने काय केली कार्यवाही..

दिल्ली – दिल्लीतील प्रदूषणाशी संबंधित ग्रीन दिल्ली अॅपद्वारे (Green Delhi) आतापर्यंत 42 हजार 147 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. प्रदूषणासंबंधीच्या बहुतांश तक्रारी (Complaint) एमसीडी, डीडीए आणि पीडब्ल्यूडी विभागांकडे दाखल करण्यात आल्या आहेत. ग्रीन दिल्ली अॅपद्वारे दिल्लीतील कोणताही नागरिक प्रदूषणाबाबत (Pollution) तक्रार करू शकतो. या तक्रारीच्या आधारे नंतर कारवाई केली जाते. प्रदूषणाच्या तक्रारींमध्ये प्रामुख्याने रस्त्यांवरील खड्डे, रस्त्याच्या कडेला कचरा बेकायदेशीरपणे टाकणे, रस्त्यावरील धूळ, बांधकाम आणि पाडलेल्या कचऱ्यामुळे होणारे धूळ प्रदूषण यांचा समावेश आहे.

Advertisement

दिल्ली सरकारच्या म्हणण्यानुसार, अॅपवर आलेल्या तक्रारींपैकी प्रदूषणाशी संबंधित 94 टक्के तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. अॅपद्वारे आतापर्यंत 42 हजार 147 तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी 39 हजार 438 हून अधिक तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे. ग्रीन अॅप हे दिल्लीतील 29 विभागांचे संयुक्त व्यासपीठ आहे. ग्रीन दिल्ली अॅपवर प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींवर सर्व संबंधित विभागांसोबत संयुक्तपणे कार्यवाही केली जाते. त्यात केंद्र सरकार, दिल्ली सरकार, मनपा या विभागांचाही समावेश आहे.

Advertisement

पर्यावरण गोपाल राय मंत्री म्हणाले की, प्रदूषणाची कोणतीही तक्रार आल्यावर ग्रीन वॉर रूमच्या संबंधित विभागाला त्याबाबत कळवले जाते. समस्या सोडवल्यानंतर संबंधित विभाग ग्रीन वॉर रूमला तक्रार निवारण संदेश देतो. यानंतर, ग्रीन मार्शलचे टास्क फोर्स प्रत्यक्षात समस्येचे निराकरण केले आहे की नाही हे तपासण्यासाठी कार्यवाही करते.

Loading...
Advertisement

दरम्यान, गेल्या काही वर्षांत वायू प्रदूषण (Air Pollution) हा एक मोठा धोका म्हणून समोर आला आहे. वेगाने वाढणारी वाहनांमुळे शहरांतील प्रदूषणात मोठी वाढ होत आहे. आज तर राजधानी दिल्ली शहरात श्वास घेणे सुद्धा कठीण झाले आहे. या शहरात वायू प्रदूषण प्रचंड वाढले आहे. हवेची गुणवत्ता खराब झाल्याने नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन येथील प्रशासनाने केले आहे. जगातील अन्य देशांनाही या संकटाचा सामना करावा लागत आहे. भारता शेजारील चीन (China) आणि पाकिस्तान (Pakistan) या देशांतही वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढले आहे.

Advertisement

सावधान.. फक्त प्रदूषणच नाही तर ‘त्यामुळे’ ही नष्ट होतेय पृथ्वीचे संरक्षण कवच; पहा, कुणी केलाय ‘हा’ खुलासा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply