Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अंबानी आता नाही होऊ शकणार ‘बिग बाझार’चे मालक, ‘हे’ कारण ठरलं आडकाठी..!

नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांची ‘रिलायन्स इंडस्ट्रीज’ आणि किशोर बियाणी यांची ‘फ्यूचर ग्रुप’ कंपनी यांच्यातील 24 हजार कोटी रुपयांचा करार संपुष्टात आला. रिलायन्सतर्फे नुकतीच मुंबई शेअर मार्केटला ही माहिती देण्यात आली. दोन्ही समूहांमध्ये अलीकडेच या करारावरून मोठा वाद रंगला होता. त्यामुळे ‘फ्यूचर ग्रुप’चे ‘बिग बाझार स्टोअर्स’ आता रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीची होऊ शकणार नाहीत.

Advertisement

फ्यूचर ग्रुपच्या फ्यूचर रिटेल व अन्य सूचिबद्ध कंपन्यांनी आपले समभागधारक व पतपुरवठा संस्थांनी या करारावर शिक्कामोर्तब करावे, असा प्रस्ताव ठेवला होता; पण हा प्रस्ताव नामंजूर करण्यात आला. फ्यूचर ग्रुपला कर्जपुरवठा करणाऱ्या संस्थांनी या प्रस्तावाला मोठ्या प्रमाणात विरोध केला. फ्युचर समूहाच्या बहुतांश मोठ्या कर्जदारांनी या प्रस्तावित कराराच्या विरोधात मतदान केले. परिणामी, रिलायन्स इंडस्ट्रीजकडून हा करार रद्द करण्यात येत असल्याचे जाहीर करण्यात आले.

Advertisement

‘रिलायन्स’ने ऑगस्ट-2020 मध्ये बिग बाजार, ईझी-डे आणि ‘एफबीबी’सारख्या नाममुद्रांच्या देशातील 420 शहरांमध्ये पसरलेल्या 1800 हून अधिक दालने असणाऱ्या ‘फ्युचर रिटेल’च्या व्यवसायासाठी 24,713 कोटींना खरेदी करण्याचा करार केला होता. त्यानुसार फ्यूचर ग्रुपच्या 19 कंपन्या रिलायन्सच्या मालकीच्या होणार होत्या.

Loading...
Advertisement

फ्युचर रिटेल, फ्युचर लाइफस्टाइल फॅशन्स आणि इतर समूहातील कंपन्यांच्या भागधारक आणि असुरक्षित कर्जदारांनी (अनसिक्युअर्ड क्रेडिटर्स) रिलायन्स रिटेलसह एकत्रीकरणाच्या बाजूने मतदान केले. मात्र, फ्युचर कंपन्यांच्या पाच पैकी चार सिक्युअर्ड क्रेडिटर्सने रिलायन्स समूहाला किरकोळ (रिटेल) आणि घाऊक व्यवसाय विकण्याच्या विरोधात मतदान केले. त्यामुळे करार रद्द करण्यात आला. ‘फ्युचर’सोबतच्या करारातून ‘रिलायन्स’ने माघार घेतल्यामुळे ‘फ्युचर समूह’ दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे.

Advertisement

दरम्यान, रिलायन्स इंडस्ट्रीज व फ्यूचर ग्रुपमधील करार सुरुवातीपासून वादात अडकला होता. सुरुवातीला ‘ॲमेझॉन’ने सिंगापूर इंटरनॅशनल आर्बिट्रेशन सेंटरकडे (एसआयएसी) या कराराविरुद्ध दाद मागितली. नंतर हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय व नॅशनल लॉ ट्रायब्युनलकडे गेले. ॲमेझॉनने फ्यूचर कूपनबरोबर केलेला करार कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने (सीसीआय) स्थगित केला, तसेच करार करते वेळी काही माहिती लपविल्याचा ठपका ठेवत ॲमेझॉनला २०२ कोटी रुपयांचा दंडही ‘सीसीआय’ने ठोठावला होता.

Advertisement

.. म्हणून इम्रान खान करणार निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन.. नव्या सरकारचे वाढणार टेन्शन..
कोरोनाच्या संकटातही भारताने जगात केले मोठे रेकॉर्ड.. शेतकऱ्यांनी दिला अर्थव्यवस्थेला आधार.. जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply