Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

जगणंच महागलंय.. आता रोजच्या वापरातील ‘या’ वस्तूंच्या किंमती वाढणार..?

नवी दिल्ली : महागाईने होरपळून निघालेल्या सर्वसामान्य नागरिकांसाठी महत्वाची बातमी आहे. सामान्य नागरिकांच्या खिशाला आणखी एकदा झळ बसणार आहे.. इंधन, गॅस दरवाढीनंतर आता पुढील महिन्यापासून पापड, गूळ, कपडे, चॉकलेट पासून तर अगदी टीव्ही, चष्मा अशा 143 वस्तूंच्या किंमती वाढणार आहेत. त्यामुळे या वस्तूंसाठी तुम्हाला अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत.

Advertisement

केंद्र सरकारच्या तिजोरीत भर घालण्यासाठी महसूल वाढविण्याचा विचार सुरु आहे. त्यासाठी मोदी सरकारने वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) अंतर्गत या वस्तूंच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दरवाढीबाबत केंद्राने राज्यांकडून मते मागवली आहेत. ही प्रस्तावित जीएसटी दरवाढ झाल्यास ग्राहकांना बसणारे महागाईचे चटके आणखी तिव्र होणार आहेत.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार,  143 पैकी 97 टक्के वस्तूंवरील जीएसटी दर 18 टक्क्यांवरून थेट 28 टक्के, म्हणजे थेट 10 टक्के वाढविण्याचा केंद्राचा प्रस्ताव आहे. त्यामुळे दैनंदिन आयुष्यात लागणाऱ्या वस्तू आणखी महागणार आहेत. आतापर्यंत पापड, गूळ यांसारख्या खाद्यपदार्थांच्या वस्तूंवर जीएसटी दर शून्य टक्के होता.

Advertisement

आता तो 5 टक्क्यांच्या कर स्लॅबमध्ये जाण्याची शक्यता आहे. अक्रोडचा दर 5 वरून 12 टक्के, मोहरी पावडर 5 वरून 18 टक्के, लाकडी टेबल व स्वयंपाकघरातील वस्तूंचे दर 12 टक्क्यांवरून थेट 18 टक्क्यांपर्यंत वाढविले जाण्याची शक्यता आहे. 2017 मध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत या वस्तूंवरील ‘जीएसटी’ कमी केल्याने सरकारचे 20 हजार कोटींचे नुकसान होत होते. हे नुकसान भरून काढण्यासाठी ‘जीएसटी’त वाढ केली जाणार आहे.

Advertisement

काय महागणार..?

Loading...
Advertisement

पापड, गूळ,  घड्याळे, पॉवर बँक, सुटकेस, चॉकलेट, परर्फ्युम, टीव्ही, च्युइंगम, मोहरी पावडर, वॉश बेसिन, चष्मे, कपडे, गॉगल, चामड्याच्या वस्तू आदी..

Advertisement

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाईने उच्चांक गाठलाय.. त्यामुळे लोकांनी खरेदीचे प्रमाण कमी केलंय. त्यामुळे सध्याची वेळ ‘जीएसटी’ दरांत वाढ करण्यासाठी योग्य नसल्याचे राज्यांनी ‘जीएसटी’ परिषदेला सांगितले आहे. बदल करायचे झाल्यास, ते टप्प्याटप्प्याने करावेत, असा सल्ला राज्यांनी दिल्याचे समजते..

Advertisement

अजानच्या वेळी भजनावर ‘बंदी’; ‘त्या’ निर्णयामुळे नाशिक पोलिस आयुक्तांची बदली?

Advertisement

निवडणुकीपूर्वी काँग्रेस बदलणार मुख्यमंत्र्यांचा चेहरा?: मुख्यमंत्र्यांनी तोडले मौन; दिले ‘हे’ उत्तर

Advertisement
Advertisement

Leave a Reply