Take a fresh look at your lifestyle.

फ्रान्सच्या राष्ट्रपतीपदी पुन्हा इमॅन्युएल मॅक्रॉन, भारतावर काय परिणाम होणार, वाचा..

नवी दिल्ली : फ्रान्सच्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा इमॅन्युएल मॅक्रॉन (Emmanuel Macron) यांनी बाजी मारली.. दुसऱ्यांदा ते फ्रान्सच्या राष्ट्रपती पदावर विराजमान होणार आहेत. इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी उजव्या विचारांच्या नेत्या मरीन ले पेन(Marine Le Pen) यांचा दणदणीत पराभव केला.. मॅक्रॉन यांना 58 टक्के, तर पेन यांना फक्त 42 टक्के मते मिळाली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 12 उमेदवार रिंगणात होते.. मात्र, मुख्य लढत मॅक्रॉन व पेन यांच्यातच झाली.. त्यात मॅक्राॅन यांनी एकतर्फी विजय मिळवला.

Advertisement

फ्रान्समध्ये रविवारी (ता. 24) राष्ट्रपती पदासाठी दुसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. तत्पूर्वी, मरीन ले पेन यांनी रविवारी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव स्वीकारला. त्यांनी विद्यमान अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना विजयी म्हणून स्वीकारले. पेन म्हणाल्या, की अध्यक्षीय निवडणुकीत त्यांची अभूतपूर्व कामगिरी स्वतःमध्येच एक जबरदस्त विजय दर्शवते. फ्रान्समधील विविध संस्था मॅक्रॉन यांच्या विजयाचा अंदाज वर्तवत होत्या.

Advertisement

गेल्या वेळीही मॅक्रॉन यांनीच पे यांचा पराभव केला होता. मरीन ले पेन यंदा तिसऱ्यांदा राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरल्या होत्या. ओपिनियन पोलमध्ये अनेक फ्रेंच नागरिकांनी अध्यक्ष म्हणून त्यांची प्रशंसा केली. कोविड-19 महामारी आणि युक्रेन संघर्ष यांसारख्या मोठ्या जागतिक संकटांना तोंड देण्यासाठी मॅक्राॅन हेच या पदासाठी योग्य मानले जात होते.

Advertisement

मॅक्रॉन यांच्या विजयानंतर त्यांच्या समर्थकांनी ‘आयफेल टॉवर’समोर मोठा जल्लोष केला. ‘आयफेल टॉवर’मधील ‘चँप डे मार्स पार्क’मध्ये एका मोठ्या स्क्रीनवर अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. नंतर मॅक्रॉन समर्थकांनी जल्लोष करीत एकमेकांचं अभिनंदन केलं..

Advertisement

मॅक्राॅन म्हणाले, की ‘मला एक निष्पक्ष समाज हवा आहे. असा समाज जिथे पुरुष व महिलांमध्ये समानता असेल. आगामी वर्ष कठीण असतील. मात्र, ते ऐतिहासिक असतील. आपल्या नव्या पिढीसाठी सोबत येऊन काम करावे लागेल.. पुढील पाच वर्षांसाठी तुम्ही माझ्यावर विश्वास दाखवला, त्यासाठी तुम्हाला धन्यवाद..”

Advertisement

दरम्यान, भारताचे फ्रान्ससोबत नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत. आजवर फ्रान्सचे कोणतेही सरकार भारतविरोधी राहिलेले नाही. मॅक्रॉन यांनी त्यांच्या रॅलीत स्पष्ट केले की त्यांच्या अजेंडावर भारताला प्रथम प्राधान्य आहे. यूएनमध्ये भारताच्या स्थायी सदस्यत्वाला फ्रान्सने नेहमीच पाठिंबा दिलाय.

Advertisement

अजानच्या वेळी भजनावर ‘बंदी’; ‘त्या’ निर्णयामुळे नाशिक पोलिस आयुक्तांची बदली?
निवडणुकीपूर्वी काँग्रेस बदलणार मुख्यमंत्र्यांचा चेहरा?: मुख्यमंत्र्यांनी तोडले मौन; दिले ‘हे’ उत्तर

Advertisement
Advertisement

Leave a Reply