Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

Navneet & Ravi Rana Political show: म्हणून रामदेव बाबांचेही आहे राणे दाम्पत्याशी कनेक्शन..!

Please wait..

नागपूर : अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत कौर राणा (Navneet Rana) हनुमान चालिसाच्या पठणामुळे (Hanuman Chalisa) चर्चेत आहेत. त्या आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या घर मातोश्री (MatoShree) बाहेर आमदार पती रवी राणा यांच्यासोबत हनुमान चालिसाचे पठण करणार आहेत. त्यामुळे सध्या त्या ट्रेंडमध्ये आहेत. अशावेळी या दाम्पत्याचे थेट सुप्रसिद्ध योग उद्योजक बाबा रामदेव यांच्याशीही नातेवाईक म्हणून कनेक्शन असल्याचे समोर आलेले आहे. एकूणच यामागे भाजप असल्याच्या आरोपांना यामुळे बळ मिळाले आहे.

Advertisement

Advertisement

बाबा रामदेव यांच्या आश्रमात सामूहिक कार्यक्रमात मातोश्रीबाहेर हनुमान चाळीचे पठण करण्यावर ठाम असलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचा विवाह झाला होता. विशेष म्हणजे नवनीत यांचे पती रवी राणा नात्यात बाबा रामदेव यांचा पुतण्या असल्याचे समजते असे नवभारत टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे. नवनीत या रवी यांना कधी भेटल्या आणि हे प्रकरण लग्नापर्यंत कसे पोहोचले हे जाणून घेऊया. नवनीत कौर यांचा सुरुवातीपासूनच योगगुरू बाबा रामदेव यांच्याशी संबंध होता. नवनीत या बाबा रामदेव यांच्या आश्रमात होणाऱ्या योग शिबिरांमध्ये सहभागी होत असे.

Advertisement
Loading...

नवनीत कौर आणि रवी राणा यांची भेट रामदेव यांच्या योग आश्रमात झाली. विशेष म्हणजे रवी राणा नात्यात बाबा रामदेव यांचा पुतण्या आहेत. नवनीत आणि रवी यांनी बाबा रामदेव यांच्याकडे त्यांच्या नात्याचा पाठपुरावा करण्याची परवानगी मागितली होती. योगगुरूंची परवानगी मिळाल्यानंतर दोघांनी 2 फेब्रुवारी 2011 रोजी लग्नगाठ बांधली. नवनीत आणि रवी राणा यांच्या लग्नाची कहाणी खूप मजेदार आहे. बाबा रामदेव यांच्या आश्रमात भेटलेल्या 3100 जोडप्यांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. नवनीत आणि रवी यांनीही या एकाच पॅव्हेलियनमध्ये सात फेऱ्या मारल्या. (Navneet Rana Amazing Pictures Of Her Wedding Step Into Politics After Films, Controversies Regarding Hanuman Chalisa At Matoshree)

Advertisement

Advertisement

हरिद्वार येथील पतंजली आश्रमात आयोजित या विवाह सोहळ्यात खुद्द बाबा रामदेव यांच्यासह महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, दिवंगत भय्यूजी महाराज उपस्थित होते. नवनीत कौर राणा यांनी बारावीपर्यंत शिक्षण घेतले आहे. त्यानंतर त्यांनी मॉडेलिंगच्या दुनियेत पाऊल ठेवले आणि नंतर चित्रपटही करायला सुरुवात केली. 3 जानेवारी 1986 रोजी मुंबईत जन्मलेल्या नवनीत कौर राणा यांना पाच भाषा येतात. मराठी, पंजाबी, तेलुगू, हिंदी आणि इंग्रजी बोलता येते. नवनीत अमरावती येथील खासदार नवनीत कौर राणा या भारतीय राजकारणातील अशा महिलांपैकी एक आहेत ज्या विविध मुद्द्यांवर अतिशय जास्त बोलतात. त्यांच्या भूमिका वेळोवेळी खूप बदलल्या आहेत. लोकांच्या मागानुसार विचार बदलणाऱ्या खासदार म्हणून त्यांची ओळख पक्की होत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply