Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

राज्यावर लोडशेडिंगचे संकट अटळ, मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना दिलाय ‘हा’ सल्ला..

मुंबई  : राज्यात एकीकडे उन्हाचा कडाका वाढत असताना, विजेच्या मागणीत प्रचंड वाढ झालीय. त्यात कोळसाचा अपुरा पुरवठा होत असल्याने राज्यासमोर लोडशेडिंगचे (power loadshedding) मोठं संकट येऊन उभे ठाकलं आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्पष्टपणे लोडशेंडिंगचे संकेत दिले आहेत. त्यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही लोडशेडिंगचे संकेत दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ‘वर्षा’ या निवासस्थानी ऊर्जा विभागाची नुकतीच बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी विजेचे संकट मान्य केले..

Advertisement

नागरिकांना काटकसरीचा सल्ला देताना ते म्हणाले, की ‘देशभर वीज तुटवड्याची स्थिती आहे. हे संकट केवळ आपल्यावर नाही. ही परिस्थिती समजून घेऊन सर्वांनीच वीज बचत करायला हवी. विजेची उधळपट्टी होऊ नये यासाठी काळजी घ्यायला हवी.. महानिर्मितीने राज्यासाठी आवश्यक वीज उपलब्ध व्हावी, यासाठी खासगी वीज कंपन्या, तसेच अन्य पर्यायी मार्गांबाबत तातडीने नियोजन करावे. खासगी वीज कंपन्यांनी अतिरिक्त वीज निर्मिती करावी. त्यासाठी लागणाऱ्या परवानग्यांसाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. वीज बचतीबाबत ग्रामपंचायत, नगरपालिका ते महापालिकास्तरांपर्यंत जागरूकता निर्माण होण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात यावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Loading...
Advertisement

‘राज्याची विजेची गरज पूर्ण करण्यासाठी सर्व पर्यायांची पडताळणी करावी. वीज गळतीबाबत बेजबाबदारपणा चालणार नाही. अन्य राज्ये करीत असलेल्या उपाययोजना, वीज देवाण-घेवाण याबाबत माहिती घेण्यात यावी. सार्वजनिक ठिकाणच्या वीज वापराबाबत उधळपट्टी होणार नाही, याबाबत जागरूक राहण्याचे निर्देश देण्यात यावेत. यासाठी ग्रामविकास, नगरविकास आणि ऊर्जा विभागाने संयुक्तपणे प्रयत्न करावेत’ असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले.

Advertisement

अजानच्या वेळी भजनावर ‘बंदी’; ‘त्या’ निर्णयामुळे नाशिक पोलिस आयुक्तांची बदली?
रहाणे-रायडूला मागे टाकत नकोसा वाटणारा; ‘तो’ विक्रम रोहितने केला आपल्या नावावर

Advertisement
Advertisement

Leave a Reply