Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

देवगिरी एक्सप्रेस दरोडा, प्रवाशांना मारहाण करीत मोठी लूट, अशी घडली घडना..!

औरंगाबाद : औरंगाबादहून मुंबईकडे जाणाऱ्या देवगिरी एक्स्प्रेसवर आज (ता. 22) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी हल्ला केला. त्यात अनेक प्रवाशांना लुटमार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दौलताबाद-पोटूळ दरम्यान ही घटना घडली. दरोडेखोरांनी सिग्नलला कापड बांधून रेल्वे थांबवली, त्यानंतर रेल्वेत घुसून लुटमार केली. या घटनेने एकच खळबळ उडाली. याच ठिकाणी 20 दिवसांपूर्वी अशीच रेल्वे अडवून प्रवाशांना मारहाण करून लुटण्यात आले होते.

Advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबादहून मुंबईच्या दिशेने मध्यरात्री देवगिरी एक्सप्रेस निघाली होती. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास दरोडेखोरांनी पोटूळ रेल्वेस्थानकाजवळ असलेल्या सिग्नलला कापड बांधून ठेवले होते. त्याच दरम्यान दरोडेखोरांनी देवगिरी एक्सप्रेसवर जोरदार दगडफेक केली. एक्सप्रेस थांबताच 5 नंबरच्या डब्यापासून 9 नंबरच्या डब्यापर्यंत दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची माहिती मिळाली.

Advertisement

देवगिरी एक्स्प्रेस येण्यापूर्वी दरोडेखोरांनी पोटूल रेल्वेस्थानकाजवळील सिग्नलवर कपडा बांधून रेल्वे थांबवली. त्यानंतर चार ते पाच दरोडेखोरांनी प्रवाशांना चाकूचा धाक दाखवून सोन्याचे दागिने, तर मोबाइल हिसकावून घेतले. याबाबत माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वेचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. एकाच महिन्यात दुसरी घटना घडल्याने पोलिसांसमोर या चोरांना पकडण्याचे आव्हान असणार आहे.

Loading...
Advertisement

दरम्यान, हे दरोडेखोर रुग्णवाहिकेतून आल्याचे समजते.. रुग्णवाहिका रेल्वे ट्रॅकजवळ उभी असल्याचे अनेकांनी पाहिले.. या घटनेनंतर देवगिरी एक्सप्रेस पुन्हा रवाना करण्यात आली. मात्र, दरोडेखोरांनी अचानक रेल्वे थांबून लुटमार सुरू केल्याने रेल्वेतील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली. बाहेरून सुरू असलेल्या दगडफेकीमुळे आतील प्रवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

Advertisement

Jobs in Marathawada: ‘त्या’ प्रकल्पातून मिळणार हजारो रोजगार; पहा मराठवाड्यातील महत्वाची बातमी
रहाणे-रायडूला मागे टाकत नकोसा वाटणारा; ‘तो’ विक्रम रोहितने केला आपल्या नावावर

Advertisement
Advertisement

Leave a Reply