Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सरकारी कर्मचारी – शिक्षकांसाठी आनंदाची बातमी, आता ‘या’ भत्त्यात होणार दणकून वाढ..!

मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे.. केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांना 1 जानेवारी 2016 पासून सातवा वेतन आयोग लागू केला. केंद्राच्या पावलावर पाऊल ठेवत राज्य सरकारनेही आपल्या कर्मचाऱ्यांना त्याच तारखेपासून वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला.. परंतु, त्यावेळी केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वाहतूक भत्त्यातही वाढ केली होती. मात्र, राज्य कर्मचाऱ्यांना ही वाढ मिळाली नव्हती..

Advertisement

ठाकरे सरकारने आता सातव्या वेतन आयोगानुसार राज्य कर्मचारी, झेडपी अधिकारी, कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वाहतूक भत्त्यात वाढ देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्य सरकार 1 एप्रिलपासून केली जाणार आहे… या निर्णयानुसार, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना किमान 675 ते 5400 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबई, एमएमआर, नागपूर, पुण्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना 1000 ते 5400 रूपये, तर इतर ठिकाणी 676 ते 2700 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे.

Loading...
Advertisement

बृहन्मुंबई, नागपूर व पुणे नागरी समूहांमधील अंध, अस्थिव्यंगाने अधू, मणक्याच्या विकाराने पीडित असणाऱ्या, तसेच मूकबधीर, श्रवणशक्तीतील दोष असणाऱ्या अधिकारी – कर्मचाऱ्यांना 2250 ते 10800 रुपये, तर इतर ठिकाणी 2250 ते 5400 रुपये वाहतूक भत्ता मिळणार आहे. राज्य शासकीय, जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी यांच्याबरोबरच राज्यातील सर्व अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील पूर्णकालीन शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच कृषी व कृषीतर विद्यापीठांमधील व त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना हा निर्णय लागू राहणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Advertisement

काँग्रेसमध्ये बैठकांचा फेरा सुरूच: होणार मोठा फेरबदल; सोनिया गांधी करणार घोषणा
काँग्रेस घेणार मोठा निर्णय: राज्यात मुख्यमंत्री बदलणार; ‘त्या’ भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण

Advertisement
Advertisement

Leave a Reply