Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अक्षय कुमारचा माफीनामा.. ‘त्या’ जाहिरातीमुळे अक्षयवर आली माफी मागण्याची वेळ..

Please wait..

मुंबई : बॉलिवूडचा ‘खिलाडी’ अर्थात अभिनेता अक्षय कुमार वेगवेगळ्या कारणांनी सतत चर्चेत असतो. मनोरंजन विश्वातील सर्वात शिस्तबद्ध अभिनेता.. अशीच त्याची ओळखला जातो. आरोग्याबाबत सतत दक्ष असणारा, फिट अॅण्ड फाईन.. असा हा हिरो गेल्या काही दिवसांपासून वेगळ्याच कारणांनी लाईमलाईटमध्ये आलाय..

Advertisement

टिव्हीवर गेल्या काही दिवसांपासून अभिनेता अजय देवगण व शाहरुख खान यांच्यासोबत अक्षय कुमारची एक जाहीरात झळकताना दिसते.. एका पानमसाल्याची जाहीरात या तिघांनी एकत्र येऊन केली आहे.. मात्र, अक्षयच्या चाहत्यांना ही बाब अजिबात आवडलेली नाही.. या जाहिरातीमुळे अक्षयला सोशल मीडियावर प्रचंड ट्रोलदेखील करण्यात आलं.

Advertisement

‘हिरोगीरी सिगारेट फुंकण्यात नाही..’ असं सांगणारा अक्षय कुमार हा पान मसाल्याची जाहिरात करीत असल्याचे पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.. त्याच वेळी दुसरीकडे साऊथचा स्टार अल्लू अर्जुनने अशाच एका जाहिरातीची ऑफर नाकारली.. त्यामुळे सोशल मीडियावर या दोन्ही स्टारबाबत तुलना केली जात होती.. जाहिरातीत शाहरुख खान व अजय देवगन असले, अक्षयलाच चाहत्यांचा प्रचंड रोष सहन करावा लागला. ही बाब अक्षय कुमारपर्यंतही पोहोचली.. त्यानंतर त्याला उपरती झाली.. आता अभिनेता अक्षय कुमार याने सोशल मीडियावर पोस्ट लिहित चाहत्यांची सपशेल माफी मागितली आहे..

Advertisement
Loading...

https://platform.twitter.com/widgets.js

Advertisement

अक्षयने भलं मोठं ट्विट करीत आपला माफीनामाच सादर केलाय.. ट्विटमध्ये तो म्हणतो, की “माझ्या सर्व चाहत्यांची, हितचिंतकांची मी माफी मागतो. गेल्या काही दिवसांत तुमच्याकडून मिळालेल्या प्रतिक्रियांनी मला प्रचंड प्रभावित केलं. मी कधीही तंबाखूसारख्या ब्रँडची जाहिरात केलेली नाहीय. यापुढेही करणार नाही. तथापि माझ्या ‘विमल इलायची’च्या जाहिरातीनंतर आलेल्या तुमच्या भावनांची मी रिस्पेक्ट करतो. मी नम्रपणे यातून माघार घेतो…”

Advertisement

अक्षय कुमारने पुढे लिहिलंय, की “या जाहिरातीतून मिळालेली सर्व रक्कम मी एका चांगल्या कामासाठी खर्च करीन, परंतु माझ्या माफीनाम्यानंतरसुद्धा हा ब्रँड माझी ही जाहिरात दाखवत राहणार. कारण, माझा करार पूर्ण होत नाही, तोपर्यंत ही जाहिरात चालवणार. परंतु यापुढे मी कोणतीही जाहिरात निवडताना अगदी सतर्क राहीन. मला तुमचं प्रेम नि शुभेच्छा हव्यात..’

Advertisement

IPL सुरू असताना किरॉन पोलार्ड ने घेतला मोठा निर्णय: चाहते झाले नाराज; चर्चांना उधाण
कोरोनावरील उपचारासाठी मंत्र्यांचा सरकारी तिजोरातून लाखोंचा खर्च, कोणी किती रुपये खर्च केले, पाहा यादी..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply