Take a fresh look at your lifestyle.

Food Oil Crises: तेलासाठी दाहीदिशा..! म्हणून खाद्यतेलासाठी तब्बल दोनेक किलोमीटर रांगा..!

मुंबई : अयोग्य आणि अशास्त्रीय पद्धतीने नियोजन केले तर आणि फक्त भावनिक आणि धार्मिक राजकारण करून देशातील जनतेची माथे भडकावून काम केले तर नेमके काय होते याचा प्रत्यय सध्या श्रीलंका देश घेत आहे. तत्पूर्वी सिरीया आणि अफगानिस्तान यासह अनेक देशांची याचमुळे वाट लागली आहे. त्याचाच प्रत्यय सध्या आणखी एक आशियाई देश घेत आहे.

Advertisement

इंडोनेशिया या आग्नेय आशियातील देशाची ओळख एक प्रमुख पामतेल निर्यातदार देश अशीच आहे. जगातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या या देशातील नागरिकांना खाद्यतेलाची तीव्र टंचाई भेडसावत आहे. सर्वसामान्य नागरिकांना तेल घेण्यासाठी दोन किमी लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. या देशात 57% किमती वर्षभरात वाढल्या आहेत. त्यातच रशिया-युक्रेन युद्धामुळे खाद्यतेलाच्या किमती वाढत असताना तेथील उत्पादकांनीही घरगुती वापरासाठी तेलाची निर्यात सुरू केली आहे. अशावेळी इंडोनेशियाच्या तेल व्यापाऱ्यांनी भविष्यात आणखी भाव वाढण्याच्या आशेने साठेबाजी करत किंमती वाढवल्या अाहेत आणि त्याला सरकारकडून अघोषित पाठींबा मिळत आहे.

Advertisement

Advertisement

कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे जैवइंधनाची मागणी वाढत आहे, ज्यामध्ये पाम तेलाचा प्रामुख्याने वापर केला असल्याचा हा मोठा फटका जगातील सर्वात मोठा पाम तेल उत्पादक आणि निर्यातदार असलेल्या देशातील जनतेला बसत आहे. त्यामुळे लोकांच्या मागणीनंतर जाग आलेल्या तेथील सरकारने 30 % उत्पादनाची स्थानिक बाजारात विक्रीचे अादेश दिले आहेत. मात्र, त्यानंतर अजूनही परिस्थिती स्थिरस्थावर होऊ शकलेली नाही. (food oil crises in Indonesia country import-export having issue)

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply