Take a fresh look at your lifestyle.

Jobs in Marathawada: ‘त्या’ प्रकल्पातून मिळणार हजारो रोजगार; पहा मराठवाड्यातील महत्वाची बातमी

औरंगाबाद : मराठवाडा म्हणजे महाराष्ट्र राज्याचे हृदय असणाऱ्या ठिकाणाचा भाग आहे. याच भागात पाणी आणि रोजगार हे प्रश्न गंभीर आहेत. त्यामुळे येथून पुणे व मुंबई शहरासह अनेक भागात स्थलांतर होत आहे. मात्र, आता याच भागासाठी एक महत्वाची बातमी आली आहे. यामुळे या भागात हजारो रोजगार मिळणार आहेत. (jalana dry port industrial estate and import-export news of marathawada jobs in aurangabad and jalana)

Advertisement

Advertisement

जालना ड्रायपोर्टजवळ जवळपास शंभर एकरवर आता मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क उभे केले जाणार आहे. यातून किमान एक हजार लोकांना थेट रोजगार मिळण्याचा अंदाज आहे. स्थानिक उद्योगांना देशांतर्गत मालवाहतुकीची सुविधा मिळणार असल्याने जालनाच नव्हे तर मराठवाड्यातील शेती व उद्योग क्षेत्राला चालना मिळेल असे म्हटले जात आहे. पार्कच्या निर्मितीसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात पुढील महिनाभरात सामंजस्य करार झाल्यावर याबाबतची कार्यवाही पुढे जाईल. माध्यमातून मराठवाड्यातील उद्योगांना आयात-निर्यातीची सुविधा जालन्यातच उपलब्ध होण्यासाठी कोल्ड स्टोअरेज, वेअरहाऊस, पॅकेजिंग सेंटर आदी सुविधा दिल्या जाणार आहेत. त्याशिवाय हे लॉजिस्टिक पार्क ड्रायपोर्टपासून अगदी जवळच असलेल्या दिनेगाव रेल्वेस्थानकाला जोडले जाणार आहे.

Advertisement

भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयांतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नॅशनल हायवे लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड ही कंपनी आणि जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट अर्थात जेएनपीटी यांच्यात या लॉजिस्टिक पार्कसंदर्भात येत्या महिनाभरात सामंजस्य करार होणार असल्याची बातमी दिव्य मराठी या वृत्तपत्राने प्रसिद्ध केली आहे. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह उद्योजक सुनील रायठठ्ठा, घनश्याम गोयल, विवेक देशपांडे आदी उद्योजकांनी केलेल्या मागणीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ड्रायपोर्टशेजारीच आता मल्टी मोडल लॉजिस्टिक पार्क उभे करण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे त्यात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply