अहमदनगर : पालक पनीर तुम्ही अनेकवेळा रेस्टॉरंटमध्ये खाल्ले असेल. अनेकवेळा तुम्ही घरी बनवण्याचा प्रयत्न केला असेल. पण त्यात हॉटेलसारखी चव आणि रंग नाही. तुम्हालाही असाच अनुभव येत असेल तर आम्ही तुमच्यासाठी खास हॉटेलमधील पालक पनीरची रेसिपी घेऊन आलो आहोत. या पद्धतीने तुम्ही अगदी घरीच हॉटेल स्टाइल पालक पनीर तयार करू शकता. चला तर मग जाणून घेऊ या काय आहे खास रेसिपी..
साहित्य – पालकाची पाने 500 ग्राम, तेल – 1½ चमचा, बटर 2 चमचे, जिरे 1 चमचा, लसूण 3/4 चमचे, बारीक केलेले अद्रक 3/4 चमचे, हिरवी मिरची 1, बारीक केलेला कांदा 2 चमचे, जिरे पावडर 1 चमचा, मिरची पावडर 1 चमचा, पनीर 200 ग्रॅम, चवीनुसार मीठ, क्रीम 2-3 चमचे.
रेसिपी
सर्वात आधी कढईत पाणी गरम करून त्यात पालकाची पाने टाका. एक मिनिटानंतर ते बाहेर काढा आणि बर्फाच्या थंड पाण्यात टाका. पाणी काढून घ्या. मिक्सरमध्ये बारीक करुन प्युरीमध्ये पालक आणि थोडेसे पाणी टाका. कढईत थोडे तेल आणि बटर टाका. जिरे, बारीक केलेला लसूण टाकून लसूण तपकिरी होईपर्यंत शिजू द्या. नंतर त्यात हिरवी मिरची, अद्रक, बारीक केलेला कांदा टाकून दोन ते तीन मिनिटे शिजू द्या. आता त्यामध्ये पालक प्युरी टाका. थोडे मीठ, जिरेपूड, तिखट टाकून काही वेळ शिजू द्या. त्यानंतर गॅस बंद करा आणि त्यात थोडी क्रीम टाका. तुमचा हॉटेल स्टाइल पालक पनीर तयार आहे. रोटी किंवा पराठ्याबरोबर गरमागरम सर्व्ह करा.
घरीच तयार करा हेल्दी पालक रोटी; दिवसाची सुरुवात होईल आरोग्यदायी.. ही आहे सोपी Recipe
संडे स्पेशल : स्वादिष्ट पालक पनीर बनवायचेय तर `ही` घ्या रेसिपी.. जेवणाची चव दुप्पट होईल..