Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

सावधान, ‘तो’ परत येतोय…! सावध ऐका, पुढील हाका..

नवी दिल्ली : भारतात गेली दोन वर्षे त्याने अनेकांना छळले.. जवळची माणसे हिरावली. काहींना कायमचं अधू केलं.. काहींच्या नोकऱ्या गेल्या, व्यवसाय-धंदे बसले.. परिणामी, अनेकांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला.. कित्येक दिवस सारंच ठप्प झालं होतं.. लोक कुलुपबंद झाली होती.. एखाद्या वाईट स्वप्नासारखं होतं सारं.. पण ते सारं दु:ख मागे सोडून माणसं पुन्हा एकदा आपआपल्या कामात व्यस्त झालीत.. पण, अजून ‘तो’ गेलेला नाही.. किंबहूना ‘तो’ परत येतोय, असंच गेल्या काही दिवसांतील परिस्थितीवरुन दिसतंय..

Advertisement

होय.. कोरोना पुन्हा एकदा डोकं वर काढतोय की काय, असा प्रश्न काही दिवसांतील आकडेवारीमुळे पडू लागलाय. गेल्या 24 तासांत देशात 1 हजारांपेक्षा जास्त नव्या कोरोना रुग्णांची भर पडलीय. त्याआधी सोमवारीही (ता. 18) देशात 2183 नव्या रुग्णांची (Corona new cases) भर पडली होती. गेल्या 24 तासांत 928 लोक बरे झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 4,30,45,527 इतकी झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून ही आकडेवारी जारी करण्यात आली आहे.

Advertisement

देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढते आहे. देशात 11,860 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरु आहेत, तर मृतांची संख्या 5,21,966 इतकी झालीय. अल्प प्रमाणात का असेना, पण पुन्हा एकदा कोरोना रुग्णवाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसतंय. ही वाढ चिंताजनक नसली, तरीही आतापासूनच काळजी घेण्याची गरजही आहे..

Loading...
Advertisement

सध्याच्या घडीला कोरोना लसीकरणावर भर देणं, हाच कोरोनाला रोखण्याचा प्रमुख उपाय असल्याचंही सांगितलं जातंय. 21 जून 2021 पासून सगळ्यांसाठी लस उपलब्ध करुन देण्यात आली होती. जास्तीत जास्त लोकसंख्या ही कोरोना प्रतिबंधक लस घेतलेली असावी, या उद्देशानं केंद्र आणि राज्य सरकारकडूनही प्रयत्न केले जात आहेत.

Advertisement

भारतातच नव्हे, तर ‘या’ देशांमध्येही पेटलाय भोंग्याचा वाद, होतेय बंदीची मागणी..!
भारताचा आणखी एक शेजारी संकटात.. इंधनाचा वापर कमी करण्यासाठी घेणार ‘हा’ निर्णय; जाणून घ्या..

Advertisement
Advertisement

Leave a Reply