Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

भारतातच नव्हे, तर ‘या’ देशांमध्येही पेटलाय भोंग्याचा वाद, होतेय बंदीची मागणी..!

नवी दिल्ली : सध्या भारतात, विशेषत: महाराष्ट्रात भोंग्यावरुन मोठा वाद पेटला आहे.. महाराष्ट्रात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा मुद्दा उचलून धरल्यानंतर अनेक राज्यांनीही हा मुद्दा उचलून धरला.. त्यानंतर ठाकरे सरकारने भोंग्याच्या वापरासाठी पोलिसांची परवानगी घेणं बंधनकारक केलं आहे.. लवकरच त्यासाठीची मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जाणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली.

Advertisement

दरम्यान, भाेंग्यामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते.. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळांनीही चिंता व्यक्त केली असून, यासंदर्भात अनेक मार्गदर्शक तत्त्वे यापूर्वीच जारी केली आहेत. सध्या भारतात हा वाद पेटला असला, तरी जगातील अन्य देशांमध्येही त्यावर बंदी घालण्याची मागणी होत आहे. त्यासाठी अनेक देशांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली आहेत. त्यात जर्मनी, नेदरलँड्स, फ्रान्स, ब्रिटन, बेल्जियमसह इतर अनेक देशांमध्ये धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकर वाजवण्यास बंधने घातली आहेत. नायजेरियामध्ये तर धार्मिक स्थळांवर भोंगे वापरण्यास पूर्णत: बंदी आहे.

Advertisement

इंडोनेशियामध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम लोकसंख्या असली, तरी येथेही धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरसारख्या उपकरणांचा अतिरेकी वापर पर्यावरणासाठी धोकादायक मानला जातो. त्याच्या वापराबाबत अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. ब्रिटनमध्ये 2020 मध्ये, वॉल्थम फॉरेस्ट कौन्सिल, लंडनने 8 मशिदींना रमजानच्या काळात त्यांच्या नमाजचे आवाहन सार्वजनिकपणे प्रसारित करण्याची परवानगी दिली. यानंतर, लंडन शहरातील आणखी अनेक मशिदींना त्यांच्या नमाजाचे आवाहन सार्वजनिकपणे प्रसारित करण्याची परवानगी देण्यात आली.

Loading...
Advertisement

अमेरिकेतही धार्मिक स्थळांवरील भोंग्यावरुन वाद निर्माण झाला आहे. 2004 मध्ये अमेरिकेतील मिशिगनमधील हॅमट्रॅक येथील मशिदीच्या वतीने अजान प्रसारित करण्यासाठी लाऊडस्पीकरची परवानगी मागितली गेली. त्यामुळे अनेक बिगर मुस्लिम रहिवाशांना त्रास सहन करावा लागला. लोकांनी सांगितले, की चर्चमध्ये जोरात बेल वाजण्याची त्यांना आधीच काळजी वाटते. यानंतर स्थानिक प्रशासनाने शहरातील सर्व धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरवरून होणार्‍या आवाजाबाबत नियम केले.

Advertisement

सौदी अरेबियाने रमजानच्या काळात मशिदींमधील लाऊडस्पीकरच्या आवाजावर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. इस्लामिक व्यवहार मंत्रालयाने सांगितले, की स्पीकरचा आवाज एक तृतीयांश पेक्षा जास्त नसावा. प्रार्थनेसाठी पहिल्या (अजान) आणि दुसऱ्या (इकामा) साठी बाह्य लाऊडस्पीकरचा वापर मर्यादित करणार्‍या परिपत्रकांचे पालन करतात, याची खात्री करण्यासाठी अधिकाऱ्यांनी मशिदीच्या कर्मचाऱ्यांना सांगितले आहे. पवित्र महिन्यात अतिरिक्त प्रार्थनेसाठी लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही.

Advertisement

मोठी खुशखबर..! लवकरच येतोय सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; पहा, काय आहेत हटके फिचर्स..
अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मोठा निर्णय, मोदी सरकारचे राज्य सरकारला पत्र..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply