Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

अधिकारी- कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत मोठा निर्णय, मोदी सरकारचे राज्य सरकारला पत्र..!

नवी दिल्ली :  सध्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने धोरण राबविण्याची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपविली आहे. मात्र, अनेक राज्य सरकारांनी मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासंदर्भात अंतिम धोरण, तसेच त्यासंदर्भातील माहितीच अद्याप गोळा केलेली नाही. त्यामुळे मागासवर्ग प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्याची प्रक्रिया थांबलेली आहे. त्यामुळे अनेक विभाग, मंत्रालयातील जागा ‘रोस्टर’ अर्थात बिंदूनामावली पद्धतीने भरल्या गेलेल्या नाहीत. या जागा रिक्तच असल्याने त्याचा परिणाम प्रशासकीय कामकाजावर होत आहे.

Advertisement

पदोन्नतीतील आरक्षणाविषयी सर्वोच्च न्यायालयाने काही अटी टाकल्या आहेत. त्या अटींच्या अधिन राहून ‘रोस्टर’ पद्धती, म्हणजेच बिंदूनामावलीनुसार आरक्षित वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्याची सूचना केंद्र सरकारने राज्य सरकारांना केली आहे. यासंदर्भात केंद्राच्या मनुष्यबळ व सार्वजनिक तक्रार निवारण मंत्रालयाने राज्य सरकारांना पत्रे पाठवली आहेत.

Advertisement

पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात जर्नेलसिंग विरुद्ध लच्छमी नरेन गुप्ता ही याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही. त्यामुळे किमान बिंदूनामावली पद्धतीनुसार पदोन्नतीतील जागा भरल्या जाव्यात, त्यानुसार पदोन्नती देण्यात यावी, अशी सूचना केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना केली आहे.

Loading...
Advertisement

तसेच, मागास प्रवर्गातील अधिकाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण देण्यासाठी ज्या अटी घातलेल्या आहेत, त्यानुसार राज्य सरकारने तुलनात्मक माहिती गोळा करावी. त्यात व्यक्तींच्या एकूण संख्येऐवजी ‘प्रतिव्यक्ती’ अशा पद्धतीने माहिती गोळा करावी. बिंदूनामावली अर्थात रोस्टर पध्दत उपलब्ध असेल, तर त्यातील उपलब्ध रिक्त जागांची माहिती आणि त्यानुसार भरलेल्या जागांची प्रति उमेदवार माहिती गोळा करावी, अशी सूचनाही कार्मिक मंत्रालयाने राज्य सरकारला केली आहे. पदोन्नतीत आरक्षण देताना यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाकडून जो निकाल दिला जाईल तो लागू राहील, असेही केंद्राने स्पष्ट केले आहे.

Advertisement

आजची रेसिपी : अशा पद्धतीने तयार करा खमंग जिरा बटाटा.. जाणून घ्या, एकदम सोपी रेसिपी

Advertisement

Todays Recipe : वेगळ्या पद्धतीने तयार करा टेस्टी भरलेले वांगे.. ही आहे सोपी रेसिपी..

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply