नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठ्या प्रमाणात झळ बसत आहे. या महागाईत आणखी भर पडण्याची चिन्हे आहेत. कारण, आता केंद्र सरकार वस्तू व सेवा करात (जीएसटी) (GST RESTRUCTURE) बदल करण्याच्या विचारात आहे. मागील काळात ‘जीएसटी’ कपात केलेल्या 25 वस्तूंवरील कराबाबत फेर आढावा घेतला जाणार आहे. दुसरीकडे, कंपन्यांचा वस्तूंचा निर्मिती खर्च वाढलाय.. त्यामुळे कंपन्यांनी वस्तूंचे भाव पाच ते दहा टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतलाय.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडक वस्तूंवर ‘जीएसटी’ आता 18 टक्क्यांवरुन 28 टक्के केला जाणार आहे. त्याचा थेट फटका वॉशिंग मशीन, फ्रिज आणि एसी सांरख्या वस्तूंच्या किंमतीवर होणार आहे. त्यामुळे वातानुकूलित उपकरणे खरेदी करण्याचा विचार असेल, तर लवकर निर्णय घ्या, अन्यथा नंतर तुमच्या खिशाला अधिक झळ बसू शकते. सध्या वातानुकूलित संयंत्रावर 18 टक्के जीएसटी आकारला जातो.. केंद्र सरकारने 4 वर्षांपूर्वी या वस्तूंवरील जीएसटी 28 वरुन 18 टक्के करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता त्यात पुन्हा एकदा बदल होणार आहे..
दरम्यान, ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीला 5 वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्त मंत्रिगट व जीएसटी परिषदेची बैठक लवकर होण्याची शक्यता आहे. त्यात विविध वस्तू व सेवांची वर्गवारी कर टप्प्यांत करण्यात आली आहे. सध्या जीएसटीचे 5 टक्के, 12 टक्के, 18 टक्के, 28 टक्के असे चार कर टप्पे आहेत. मात्र, आता केंद्र सरकार जीएसटी कर टप्पे कमी करणार असून, ही संख्या चार वरुन तीन करण्याचा विचार सुरु आहे..
केंद्र सरकारने कर टप्पे कमी केल्यास त्याचा थेट परिणाम वस्तूंच्या किंमतीवर होणार आहे. कर टप्पे कमी करुन महसूल वाढवण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. प्रस्तावित रचनेनुसार, सर्वात कमी कराचा टप्पा 6 टक्क्यांचा असू शकतो.. सध्या सर्वात कमी कराचा टप्पा 5 टक्के आहे..
मोठी खुशखबर..! लवकरच येतोय सॅमसंगचा ‘हा’ जबरदस्त स्मार्टफोन; पहा, काय आहेत हटके फिचर्स..
Jio-Airtel च्या या प्लानमध्ये दररोज मिळतोय 1 GB डेटा; पहा, किती होतील पैसे खर्च