Please wait..
Take a fresh look at your lifestyle.

म्हणून महाराष्ट्र अंधारात; पहा कोणी केलाय हा काळाकुट्ट कारनामा..!

Please wait..

पुणे : सध्या महाराष्ट्र राज्यात नव्हे तर अवघ्या भारतात कुठे ना कुठे विजेचे भारनियमन आणि टंचाई या समस्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी राज्य सरकार आणि राज्य सरकारचा उर्जा विभाग टीकेचे लक्ष्य बनला आहे. मात्र, यासाठी फक्त राज्य सरकार नाही तर देशातील कोळसा टंचाई आणि ती निर्माण होण्यासाठी जबाबदार असलेले कोळसा मंत्रालय आणि केंद्रीय वीज मंत्रालय जबाबदार आहे. त्यामुळेच यावरून देशभरात राजकारण तेजीत आहे. शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. तर ग्रामीण भागात पाण्यासाठी अनेकांना वणवण करावी लागत आहे. (Power Crisis In Maharashtra, Maharashtra Minister Points To Impending Coal)

Advertisement

Advertisement
Loading...

महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी दावा केला की, राज्याला कोळसा आणि वीज संकटाचा सामना करावा लागत आहे कारण काही प्रकल्पांमध्ये केवळ 1.5 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. मात्र, वीज संकट सोडविण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची ग्वाही मंत्र्यांनी दिली. राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील काही प्लांटमध्ये 1.5 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे, काहींमध्ये 3 दिवसांचा आणि काहींमध्ये 6 दिवसांचा कोळसा शिल्लक आहे. वीज संकटावर मात करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. जलसंपदा मंत्र्यांना जलविद्युत निर्मितीसाठी पाणीपुरवठा करण्यास सांगितले आहे.

Advertisement

त्याचवेळी कोयना धरणात 17 टीएमसी पाणी शिल्लक आहे, वीज निर्मितीसाठी दररोज 1 टीएमसी पाणी लागते. लोडशेडिंग सोडवायचे असेल तर कोळसा, पाणी आणि गॅसची गरज आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या करारानुसार त्यांनी राज्य सरकारला एपीएम गॅस द्यायला हवा. मात्र मदतीपूर्वी केंद्र सरकार थकबाकी मागत आहे. महाराष्ट्र सरकारचे मंत्री पुढे म्हणाले की, केंद्राशी झालेल्या करारानुसार राज्याला एपीएम गॅस मिळण्याचा अधिकार आहे. त्यांनी पुढे दावा केला की केंद्राने राज्याला आवश्यक एपीएम गॅस प्रदान केला नाही आणि लोडशेडिंग सोडवायचे असेल तर कोळसा, पाणी आणि गॅस आवश्यक आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारला 2200 कोटी रुपये द्यायचे आहेत. त्यांना आधी पैसे द्या, मगच कोळसा देऊ, असे केंद्राने सांगितले आहे. एकूणच राज्यावरील विजेच्या संकटास असे सगळेच घटक कारणीभूत आहेत.

Advertisement

Advertisement
Advertisement

Leave a Reply